पुणे- अनिता अवचट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार संघर्ष सन्मान पुरस्कार नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात काम करणारे चन्द्रपुरंचे बंडू धोत्रे आणि शारीरिक अपंगत्वाचा सामना करणारे नीलेश छडवेलकर यांना देण्यात आला. या वेळी डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट, डॉ. अरुण कुलकर्णी, मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होते.
यावेळी बंडू धोतरे म्हणाले, निसर्गाचा नियम आपण फॉलो करत नाही म्हणून आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागते. आज वाघ दुर्मिळ होत असून त्यांना वाचविण्याची गरज आहे. वाघ वाचविण्यासाठी चंद्रपूरबरोबरच राजकीय पातळीवरदेखील प्रयत्न करणार आहे. चंद्रपूर येथील कोळसा खाणीला आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेला विरोध वाघ वाचविण्याचाच एक प्रयत्न होता.