Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १६, २०१३

पालकमंत्री ना.संजय देवतळे यांचा दौरा

पालकमंत्री ना.संजय देवतळे यांचा दौरा   
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याचे पर्यावरण, सांस्कृतिक कार्यमत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय देवतळे हे  दिनांक १८ व १९  फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सोईनुसार वरोराकडे प्रयाण करुन वरोरा येथे मुक्काम राहील. त्यानंतर   दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा.वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर शासकीय विश्रामगृह येथे १०.३० वा.आगमन व राखीव वेळ राहील.  त्यानंतर बचत साफल्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील आणि बैठक संपल्यानंतर चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
                    ००००
 ना.श्रीमती फौजीया खान यांचा दौरा
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
 राज्याच्या सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास (औकाफसह) राज्यमंत्री  ना.श्रीमती फौजीया खान हया दिनांक १६  व १७ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायं.५ वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे रात्रो ७.२० वा.शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहील.
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे राखी व असून दुपारी १२.०० वा.सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेस महिला मेळाव्यास उपस्थित राहतील आणि सायं.४ वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

२२ रोजी जिल्हा नियोजन समिती निवडणूक
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवडणूक २२ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. सदर निवडणूक ग्रामीण निर्वाचन क्षेत्र, मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र व लहान नागरी निर्वाचन क्षेत्र अशा निर्वाचन क्षेत्रात होणार असल्याचे निर्वाचन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ग्रामीण मतदार संघामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे सर्व निर्वाचित ५७ सदस्य मतदार असणार आहे.  यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.  मोठे नागरी मतदार संघासाठी चंद्रपूर महानगर पालिकेतील सर्व ६६ सदस्य मतदार आहेत.  यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात मतदान केंद्र आहे.  तर लहान नागरी मतदार संघासाठी नगर परिषद भद्रावती, वरोरा, मूल, ब्रम्हपूरी, बल्लारपूर व राजूरा येथील निर्वाचित सदस्य मतदार आहेत.  यासाठी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे असे निर्वाचन अधिकारी सी.एस.डहाळकर यांनी कळविले आहे.
       

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.