पनवेल- फेसबुकच्या माध्यमातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणा-या पनवेलच्या अल्पवयीन आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केलीय.
३० जानेवारीपासून दोन अल्पवयीन मुलींना पळवलेल्या या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फेसबुकच्या विळख्यात सापडून तरूण पिढीची नैतिकता खालावत चालली आहे का हा प्रश्न नेहमीच विचारला जातोय. याला दुजोरा देणा-या घटनाही नेहमी घडताना दिसतायत. याच फेसबुकच्या जाळ्यात दोन अल्पवयीन मुली सापडल्या.
पनवेलमध्ये राहणा-या १७ वर्षीय अल्पवयीन मुलानं फेसबुकच्या माध्यमातून चंद्रपूरातल्यादोन मुलींसोबत मैत्री केली. प्रेमाचं आमीष दाखवून तरूणानं दोन्ही मुलींना घरून पळून जाण्यास सांगितलं. त्याच्या प्रेमापोटी 10वीत शिकणा-या दोन अल्पवयीन मुली 30 जानेवारीला घरून पळून गेल्या.
पोलिसांनी या तिघांच्याही मोबाईल लोकेशन वरून त्यांचा शोध घेतला असता ते छत्तीसगडच्या डोंगरगड येथे असल्याची माहिती मिळाली. या मुलींसोबत फरार असतांना अल्पवयीन आरोपीन दोन्ही अल्पवयीन मुलींवर सतत बलात्कार केल्याचं वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झालंय. त्यावरून या आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आलाय. दोन्ही अल्पवयीन मुलींनी पालकांसोबत जाण्यास नकार दिल्यानं दोन्ही मुलींची रवानगी अमरावतीच्या महिला सुधारगृहात करण्यात आलीय. तर अल्पवयीन मुलाला चंद्रपूरच्या रिमांड होममध्ये पाठविण्यात आलंय. त्यामुळं फेसबुक वापरणा-या मुलांवर पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय.