Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०३, २०१३

सलाम परिघाबाहेरच्या कर्तृत्वाला!


समाजाचे दडपण, मानमर्यादांची झूल अन् सभ्यता-संस्कारांच्या परिघात अडकलेल्या महिलांना आकाशात उंच भरारी घेण्यास बरीच तजवीज करावी लागत आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता जिद्दीने, धैर्याने वाटचाल करीत यशाचे शिखर पादाक्रांत करणाèया धाडसी महिला खèया अर्थाने मसावित्रीच्या लेकीमच! कुठे पुरुषी बंधनांना आव्हान देत, तर कुठे पुरुषी सामाथ्र्याची बरोबरी करीत चंद्रपूर जिल्ह्यातील साहसी पंचकन्यांनी असंख्य महिलांना नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रप्रभा रामटेके (शॉवेल ऑपरेटर) :                       
कोळसा खाणीत शॉवेलसारखे अवजड यंत्र महिला हाताळू शकेल, याची कुणी कल्पनाही केली नसेल. पण, चंद्रप्रभाने हे यंत्र हाताळण्याचे धाडस केले. आज ती मस्ट्राँग वुमन ऑङ्क डब्लूसीएलम म्हणूनही ओळखली जाते.
बालवयातच मातृछत्र हरविले. नवव्या वर्गातच शाळा सुटली. वेकोलिच्या कामावर असलेला पती मिळाला. परंतु, व्यसन आणि आजाराने ग्रस्त पतीचे लवकरच निधन झाले. प्रयत्नांती वेकोलिने तिला नोकरी दिली. रुग्णालयात साङ्कसङ्काईचे काम दिले. हे काम करताना चंद्रप्रभाने बारावीपर्यंत आणि टायqपगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे तिला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम मिळाले. या कामावर असताना वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी येणारी अवजड यंत्रे ती न्याहाळू लागली. चंद्रप्रभाने मशीन ऑपरेटर होण्याची इच्छा बोलून दाखविली. कामगार नेते शंभू विश्वकर्मा यांनी चंद्रप्रभाला प्रोत्साहन दिले. वरिष्ठ अधिकाèयांपर्यंत तिची इच्छा पोहोचविली. सुरवातीला वरिष्ठ अधिकाèयांनी तिला नकार दिला. मात्र, तिची जिद्द बघून अधिकाèयांनीच  चंद्रप्रभाला मशीन हाताळण्याच्या प्रशिक्षणाला पाठविले. आज ती वेकोलित मशॉवेल ऑपरेटरङ्क असणारी पहिली महिला ठरली आहे.


नंदा हाटे (शॉवेल ऑपरेटर) :                                         
लग्न झाल्यानंतर पूर्णतः पतीवर निर्भर असणाèया नंदाचा प्रवासही थक्क करणारा आहे. नंदाचे पती सुरवातीला एका खासगी ट्रान्स्पोर्टिंग कंपनीत चालक होते. एकदा अमरावतीहून परतत असताना मध्येच त्यांनी ट्रक थांबविला. नंदाला चालकाच्या जागेवर बसण्यास सांगितले. नंदाने ट्रकचा ताबा घेतला. पतीच्या सल्ल्यानुसार एक किलोमीटरपर्यंत ट्रक चालविला. गमतीने केलेला हा खेळच पुढे नंदाच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. नंदाच्या पतीने आत्महत्या केली. या घटनेने नंदाचे आयुष्यच बदलले. पतीच्या निधनानंतर तिला वेकोलित नोकरी मिळाली. डंपर आणि इतर यंत्रांची साङ्कसङ्काई आणि ग्रिqसग करण्याचे काम तिला मिळाले. एकदा ग्रिqसगच्या कामानंतर नंदाने चक्क वॉqशग रॅम्पवरून डंपर खाली उतरविला. त्यावेळी तिथे उपस्थित साèयांच्याच मनात धडकी भरली. त्यांनी नंदाला खडे बोल सुनावले. डंपर घसरून अपघाताची शक्यता असल्याने हे काम करायला अनेकजण घाबरतात. तेच काम नंदाने सहज केले. तिच्या या धाडसाने अधिकाèयांनाही विचार करण्यास भाग पाडले. तिने मशीन चालविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार नंदाला अवजड यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आज ती मशॉवेल ऑपरेटरङ्क म्हणून पद्मापूर कोळसा खाणीत पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे.


अल्का कुसळे (ऑटोचालक) :                                  
 गर्दीतून ऑटो चालवीत मार्ग काढून प्रवाशांना घरापर्यंत पोहोचविणे म्हणजे जिकरीचेच काम. हे धाडस केवळ पुरुषानेच करावे, असा साधारणतः प्रघात पडला आहे. मात्र, याला छेद देत चंद्रपुरात वर्दळीच्या रस्त्यांवर ऑटो चालविणाèयांच्या रांगेत उभी असते एक महिला. तीच ही अल्का कुसळे. अल्काचे पती पोलिस विभागात काम करतात. पण, अल्काला आत्मनिर्भर होऊन जगणे अधिक पसंत. म्हणून बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या अल्काने नोकरीसाठी इतरांजवळ तगादा लावण्याऐवजी कुणाचेही निर्बंध नसलेला ऑटो चालविण्याचा व्यवसाय पत्करला. तिला चार वर्षांची मुलगीही आहे. शाळा आटोपून ती घरी आली की तिला सोबत घेऊनच ती आपल्या कामाला निघते. ऑटो चालविण्याची प्रेरणा तिला तिच्या आईनेच दिली. पतीने हा व्यवसाय करण्यास पूर्ण सहकार्य केले. आता ती पूर्णपणे स्वतःच्या मिळकतीवरच आपले व आपल्या मुलीचे पालनपोषण करते.


शाहीन ङ्कातेमा कुरेशी (समाजसेविका) :                           
अतिशय गरीब कुटुंबातील शाहीन. जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण झाले. सोबतच शिवणकलेचे प्रशिक्षण घेतेले. लग्नानंतरची परिस्थितीही तीच होती. पतीचा कापडविक्रीचा व्यवसाय होता. अचानक पतीची प्रकृती बिघडली. औषधपाण्याचा अङ्काट खर्च होता. त्यातच कर्जाचा डोंगर वाढत गेला अन् दुकानही बुडाले. शाहीनने जिद्द सोडली नाही. पतीसह दोन मुले अन् एक मुलगी, असा त्यांचा संसार. पतीने लहानसा पानठेला चालविण्याचा व्यवसाय पत्करला. शाहीनने कपडे शिवून, शिकवणी घेऊन संसाराचा गाडा ओढण्यास सुरवात केली. प्रतिकूल परिस्थितीत संसारात गुरङ्कटून पडेल ती शाहीन कसली? अत्याचाराने पीडित महिलेने हाक मारली की शाहीन तयारच असे. घरगुती झगडे, रुग्णालयाचे काम, महिलांची अडलेली कामे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासारख्या कामासोबतच गावातील सर्व महिला बचतगटांमध्ये समन्वय साधून त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्याच्या कामातही शाहीन अग्रेसर असते. स्वतःला बुरख्यात झाकून घेण्यापेक्षा समाजातील दु:ख उघड्या डोळ्यांनी पाहून त्यावर ङ्कुंकर घालण्यासाठी प्रयत्न करण्यातच शाहीनचा जास्त विश्वास आहे.   


सुलोचना रोहणे (आदर्श माता) :                                
 सारे काही आलबेल असतानाच अचानक जीवनाची गाडी रुळावरून घसरली की भल्याभल्यांची तारांबळ उडते. काही जण मात्र परिस्थितीशी संघर्ष करतात. राजुèयातील सुलोचना रोहणे ही नगरपालिकेत शिपाई पदावर काम करणारी महिला याच पठडीतील. पती कर्करोगाने दगावले. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सात वर्षांचा होता. त्याच्यानंतर एक मुलगीही होती. मुलांच्या पालनपोषणाचा, शिक्षणाचा प्रश्न होताच. शिवाय पतीच्या उपचारासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगरही वाढला होता. पण, सुलोचनाने हार मानली नाही. पतीच्या जागेवर सुलोचनाला नोकरी मिळाली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मुलांसाठी वाट निवडली. मुलगा हुशार निघाला. त्याची आय.एङ्क.एस. (इंडियन ङ्कॉरेस्ट सव्र्हिस)साठी निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची ताकद त्या निराधार मातेने निर्माण केली, म्हणूनच विस्कटलेल्या संसारात पुन्हा हास्य ङ्कुलले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.