गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीमध्ये सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या चकमकीमध्ये सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
आहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील गोविंदगाव येथे नक्षवलादी येणार असल्याची माहिती आहेरी पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री पोलिस अतिरिक्त पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि नक्षलवाद्यांच्यात चकमक झाली. यात सहा नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शंकर ऊर्फ मुलेश्वर जक्तु लकडा(४३),विनोद ऊर्फ चंद्रय्या(३०), मोहन ऊर्फ कोवासे (२५), गिता उसेंडी(२८), झुरू मट्टामी(२८) आणि सुनीता कोडापे(१८) अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.
चकमकीनंतर शोध मोहिमेत पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी सापडला. यामध्ये दोन एस.एल.आर रायफल, दोन .३०३ रायफल व एक आठ एम एम सिंगल बॅरल बंदुक व काही जिवंत काडतुसे आणि इतर नक्षल साहित्याचा समावेश आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह अहेरी येथेली पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आहेत.