अॅड. अभिजित वंजारी : तेली समाजाचा वधू-वर परिचय मेळावा
चंद्रपूर : लग्न ही परंपरा असलीतरी ती समाजाची गरज आहे. त्यामुळे लग्न करताना कर्जबाजारी होणे मूळीच योग्य नाही. लग्नासाठी कर्जात डुबून जीवन जगण्यापेक्षा सामूहिक विवाहाची कास धरून खर्चाची बचत करा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे व्यवस्थापक सदस्य तथा सिनेट सदस्य अॅड. अभिजित वंजारी यांनी केले.
तेली युवक मंडळाच्या वतीने रविवारी (ता. १३) तुकूम येथील मातोश्री सांस्कृतिक सभागृहात आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते
मेळाव्याचे उद्घाटन संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. अध्यक्षस्थानी कर्नाटक एम्प्टाचे उपाध्यक्ष अरुण हजारे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रचारक उषाताई हजारे, मोटार वाहन निरीक्षक कार्यालयाचे सहायक अधिकारी सुजित बाविस्कर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे बबनराव ङ्कंड, ङ्किमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विजयराव मोगरे, गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र खनके, प्रा. वासुदेवराव रागीट, स्काऊट गाईडचे आयुक्त रावजी चवरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल खनके यांची मंचावर उपस्थिती होती. मेळाव्यात वर-वधूंची माहिती असलेली मप्रेरणा-१४ङ्क ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. यात सुमारे सातशे उपवर-वधूंचे नाव, शिक्षण, जन्मतारीख, मामेकूळ, नोकरी,व्यवसाय, अपेक्षा आदी माहिती होती.
उद्घाटनीय भाषण करताना अॅड. अभिजित वंजारी म्हणाले, आज प्रत्येकाला वैयक्तिक कामासाठी वेळ कमी पडत आहेत. शिवाय विनाकारण वेळ घालविणे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत करून गरजूंना मदत करण्याची वेळ आली आहे. समाजातील प्रत्येकाची लग्न थाटत करण्याची कुवत नाही. त्यामुळे खर्चाला मर्यादा असतात. त्या पाळून ज्यांना गरज आहे, अशांना मदत केली पाहिजे. शिवाय सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजन झाल्यास मोठा खर्च कमी होऊन गरिबांची सेवा करण्याचे पूण्य लाभेल. ज्यांना सामूहिक विवाह करणे शक्य नाही, अशांना खर्चात बचत करून छोटेखाणी कार्यक्रम करावा. बचतीची रक्कम गरिबांना दान करावी, असे आवाहन केले.
यावेळी कर्नाटक एम्प्टा कोळसा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष अरुण हजारे यांनी सामूहिक विवाहासाठी आर्थिक मदतीची घोषणा करीत स्वकुटुंबातील विवाहातच किमान १० गरिब जोपड्यांचा विवाह करून देण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी, तर आभार संध्या बिजवे यांनी मानले.