Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १६, २०१२

प्रत्येक तालुक्यात क्रिंडा संकुल उभारणार


 क्रिडामंत्री पद्माकर वळवी
    चंद्रपूर दि.16- जिल्हयातील युवकांच्या क्रिडा गुणांना वाव देण्याचे शासनाचे धोरण असल्याने प्रत्येक तालुक्यात सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले क्रिडा संकुल उभारण्याचा शासनाचा निर्णय असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.पद्माकर वळवी यांनी चंद्रपूर जिल्हयातील कोरपना येथे बहुउद्येशिय क्रीडा संकुलाच्या भुमिपूजन प्रसंगी व्यक्त केले. 
     यावेळी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, जैनुद्दीन जव्हेरी, क्रिडा व युवक सेवा नागपूरचे उपसंचालक जयप्रकाश दुबळे, राजू-याचे उपविभागीय अधिकारी  एम.ए.राऊत, कोरपना येथील तहसिलदार कुमरे,जिल्हा क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, सुभाष गौर, विनायक बांगडे, आबेद अली, मनोहर पाऊनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 जिल्हयात क्रिडा संकुलामध्ये विविध प्रकारच्या सोयी व सुविधा निर्माण करण्यासाठी आलेल्या अनुदानाचा उपयोग कामाचे प्राधान्य ठरवून  खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा मंडळाची असल्याचे प्रतिपादन क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.पद्माकर वळवी यांनी चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा स्टेडीयम येथे आयोजित परिसंवादाला संबोधित करतांना व्यक्त केले.  यावेळी माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड, सुभाष गौर, विनोद अहीरकर व इतरही मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी क्रिडा मंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्हयात वेगवेगळया खेळाचे चार प्रशिक्षक (कोच) शासनातर्फे नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्हयातील प्रशिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले असून त्यांना तालुक्यामध्ये सुध्दा जावून युवकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  त्याचप्रमाणे जिल्हयातील युवक खेळामध्ये कसे जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी सुध्दा शासन स्तरावर धोरण ठरविण्याचे काम सुरु आहे असेही ते म्हणाले. 
     या परिसंवादामध्ये महेश डोंगरे क्रीडा संघटक, श्री.बलकी, राजेश नायडू यांनी सहभाग घेवून आपले मनोगत व्यक्त केले. या परिसंवादाचे संचालन हरिभाऊ पाटोळे यांनी केले असून परिसंवादास मोठया संख्येने खेळ प्रेमी व खेळाडू उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.