Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २३, २०१२

नागपूरजवळ अपघातात ५ जण ठार

नागपूर - नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर आज (रविवार) सकाळी रामटेकहून कोंढाळीकडे जात असलेली एसटीबस आणि ट्रकमध्ये आमळीफाटा येथे झालेल्या अपघातात पाच जण ठार, तर २० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीबस पारशिवणीकडे वळत असताना आमळीफाटा येथे समोरून येणाऱ्या ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. धडक दिल्याने ट्रक आणि एसटी बाजूला उभ्या असलेल्या टँकरला जाऊन धडकले आणि ही दोन्ही वाहने पलटी झाली. त्यामुळे एसटी महिला कंडक्टरसह पाच जण ठार झाले. मृतांमध्ये एसटीतील पाच जणांचा समावेश असून, यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष ठार झाले आहेत. जखमींना नागपूरमधील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचठिकाणी मार्च महिन्यात ट्रॅक्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात १२ जण ठार झाले होते. आज झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर एसटी विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताज्या बातम्या सचिनच्या घरी अवतरला दिग्गज क्रिकेटपटू नागपूरजवळ अपघातात ५ जण ठार जांगीपूरमध्ये काँग्रेसविरोधात तृणमुल नाही लढणार तिरंदाज दीपिका कुमारीचा अंतिम फेरीत पराभव सुरेश पठारेंनी सोडली अण्णा हजारेंची साथ ईशान्येकडील राज्यांना पुराचा फटका; २० ठार परळीजवळ रेल्वे डबे घसरल्याने वाहतूक विस्कळित 'बर्फी' भारतातर्फे जाणार ऑस्करला मथुराजवळ मंदिरात चेंगराचेंगरीत दोन महिला ठार

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.