Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर ०९, २०१२

सामान्य रुग्णालयात शंभर खाटांवर दीडशेवर बाळंतीण


देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. ८ : तीनशे खाटांची व्यवस्था असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १००  खाटा ‘हिला प्रसूती
कक्षासाठी असून, सध्या दीडशेवर महिला रुग्ण भरती झाल्याने गैरसोय होत आहे. शिवाय केवळ दोन
डॉक्टर आणि अल्पशा परिचारिकांच्या भरवशावर प्रसूती प्रक्रिया पार पाडली जात आहे.
चंद्रपूर शहरात २०१२ या वर्षात जानेवारी ते ऑगस्टमध्ये सात हजार ६४१ बाळांचा जन्म  झाला. यात तीन
हजार ९९१ मुले, तर तीन हजार ६५० मुली जन्मला आल्या. यावरून प्रत्येक महिन्यात ५०० प्रसूती संख्या असून, यातील ५० टक्के प्रसूती ही रुग्णालयात होत आहे. शिवाय शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी  येतात. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये नैसर्गिक प्रसूती होत असतानादेखील अधिक
पैसे कम विण्याच्या हव्यासापोटी सिझेरियनचा उपाय सुचविण्यात येतो. सिझेरियनसाठी एका रुग्णाला किमान २५ हजारांपर्यंत खर्च करावा लागत आहे. ही रक्कम  परवडण्यासारखी नाही. त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयात ७० टक्के प्रसूती ही नैसर्गिकरीत्या केली जात असून, दररोज २० हून अधिक बाळांचा जन्म  होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी चार कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात २५ खाटांची व्यवस्था आहे. प्रसूतिपूर्व भरती महिला कक्ष, नैसर्गिक प्रसूती कक्ष, सिझेरियन कक्ष आणि प्रसूतीनंतर राहण्यासाठी एका कक्षाची व्यवस्था आहे. एकूण १०० खाटा असलेल्या रुग्णालयात दीडशेहून अधिक महिला प्रसूतीसाठी नोंदणी करीत आहेत.  डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने केवळ दोन डॉक्टरांना प्रसूतीची प्रक्रिया पार पाडावी लागत आहे.

शववाहिकेचा अभाव, रुग्णवाहिकांची चांदी
जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत रुग्णांना पोहोचविण्यासाठी शववाहिकाच नसल्याने ‘ोठी गैरसोय होत आहे. दुसरीकडे चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली रुग्णवाहिकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची ‘ोठी लूट होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी शववाहिनीचा खर्चदेखील परवडत नाही. रुग्णालयाच्या आवारात अनेक सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिका उभ्या आहेत. रुग्णांना पोहोचविल्यानंतर त्या परत जाण्याऐवजी आवारातच ठाण मां डून बसतात. त्यामुळे पार्किंगमध्ये मोठी गर्दी होत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी या खासगी रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी वाहतूक विभागाची ‘दत घेण्यात आली होती. मात्र, एका दिवसाच्या कारवाईने कोणताही परिणाम  झालेला नाही. शववाहिनी उपलब्ध नसल्याने इथल्या रहिवाशांची रुग्णालयामधून मृतदेह नेताना गैरसोय होत आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.