Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २१, २०११

तंटामुक्त बक्षीसयादीत जिल्ह्याचा 'फॉंट' बदलला

सकाळ वृत्तसेवा

Friday, March 18, 2011 AT 12:15 AM (IST)
Tags gift list, website font, chandrapur, vidarbha
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या 2009-2010 च्या तंटामुक्त गावांच्या पुरस्कारांची घोषणा गृहविभागाने 25 फेब्रुवारीला केली. या पात्र गावांची जिल्हानिहाय यादी गृहविभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व गावांची नावे अचूक दर्शविण्यात आली आहेत. केवळ चंद्रपूर जिल्ह्याच्याच गावांमध्ये "फॉंट' (लिपी)ची समस्या असल्याने जिल्हावासींना आपल्या गावांची नावे पाहण्यास गैरसोय होत आहे. हा प्रकार 20 दिवस लोटूनही दुरुस्त करण्यात आलेला नाही.

माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे गावोगावी पोचल्यानंतर खेड्यातील सामान्य माणूसही आता मोबाईल आणि इंटरनेटशी जुळला आहे. गावात कुणाच्या न्‌ कुणाच्या घरी संगणक आणि त्यावर इंटरनेटची सुविधा आहे. त्यामुळे अनेकजण शासनाचे दररोज प्रकाशित होणारे अध्यादेश (जीआर) घरबसल्या पाहत असतात. 15 ऑगस्ट 2007 पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील संपूर्ण गावे सहभागी होतात. गावातील तंटे गावातच सोडवून लाखमोलाचे बक्षीस मिळावे म्हणून गावातील जनताही पुढे येऊ लागली आहे. 2009-2010 च्या तंटामुक्त गावांच्या पुरस्कारांची घोषणा 25 फेब्रुवारीला झाली. यात 67 गावांची निवड झाल्याची माहिती गृहविभागाच्या पत्रकात देण्यात आली. यात आपल्या गावाचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी गृहविभागाच्या "होम डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन' संकेतस्थळावर भेट देत आहेत. मात्र, त्यांची हिरमोड होऊ लागली आहे. गृहविभागाने ही यादी "पीडीएफ' प्रकारात संकेतस्थळावर प्रकाशित केली. यादीत संपूर्ण राज्यातील गावांची नावे योग्य आणि अचूक दिसतात. मात्र, जिल्ह्यातील एकाही गावाचे नाव नीट वाचता येत नाही. पीडीएफ करतेवेळी फॉंट (लिपी) बदलल्याने ही समस्या झाली असली तरी केवळ चंद्रपूर जिल्ह्याच्याच रकान्यावर अन्याय झाला आहे. क्रमांक 31 वर चंद्रपूर जिल्ह्याची यादी आहे. 30 व्या क्रमांकावर भंडारा, तर 32 क्रमांकावर गडचिरोली जिल्ह्यातील गावांची नावे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या एकाही गावाचे नाव बदललेले दिसत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील यादीची लिपी बदलल्याने 20 दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील नागरिकांना तंटामुक्त गावांची नावे कळलेली नाही, हे विशेष.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.