Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०१०

ताडोबालगतच्या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच


(जि. चंद्रपूर) -


चंद्रपूर - मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज (ता. 15) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चिमूर तालुक्‍यातील शेडगाव परिसरात घडली. tulasaabai जिरकुंडा जांभुळे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे.

चिमूर-खडसंगी मार्गावर पाच किलोमीटर अंतरावर शेडगाव आहे. येथील रहिवासी जांभुळे या वनविभागाच्या कम्पार्टमेंट क्र. 122 मध्ये मोहफुल वेचण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या ठार झाल्या. दोन महिन्यात वाघाच्या हल्ल्यांतील बळींची संख्या सुमारे नऊपर्यंत गेली आहे.


सिंदेवाही आणि मूल तालुक्‍याच्या सीमावर्ती भागात, ताडोबा जंगलाच्या शेजारी असलेल्या जंगलात तीन दिवसांपासून पट्टेदार वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, तालुक्‍यातील सिंगडझरी (वासेरा) येथील एका महिलेला गायमुख देवस्थान परिसरातील जंगलात आज (ता. सहा) सकाळी 10 वाजताच्या सुमारास वाघाने ठार केले. मंदा पटवारू तोरकपवार (वय 45) असे मृत महिलेचे नाव असून, 17 किलोमीटर परिसरातील ही तिसरी घटना आहे.



सिंदेवाही (जि. चंद्रपूर) - जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या सुंदराबाई आबाजी नन्नावरे (वय 50) या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना जामसाळा जंगलातील शिवणी वनपरिक्षेत्रात आज (ता. 5) घडली. याच तालुक्‍यात गुरुवारी नलू दिवाकर घोडमारे या महिलेलाली वाघाने ठार केले होते.
पेटगाव (जि. चंद्रपूर) - जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या येथील नलू दिवाकर घोडमारे (वय 40) रा. पेटगाव, ता. सिंदेवाही या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज (ता. चार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. नलू आणि अन्य तीन महिला शिवापूर (तुकूम) जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, वाघाने नलू घोडमारे हिच्यावर हल्ला केला. वाघाने हल्ला केल्याचे लक्षात येताच अन्य महिला तेथून घटनास्थळावरून पळून गेल्या. त्यांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. सायंकाळच्या सुमारास वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन नलूबाईचा मृतदेह ताब्यात घेतला.
मोहाळी (ता. सिंदेवाही) येथील सुंदराबाई नन्नावरे आणि अन्य काही महिला आज (ता. पाच) जामसाळा जंगलातील शिवणी वनपरिक्षेत्रात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सुंदराबाई शिवणी वनपरिक्षेत्रातील बिट क्रमांक 269 मध्ये सरपण गोळा करीत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास वाघाने सुंदराबाईवर हल्ला केला. जवळपास एक किलोमीटर त्यांना फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. सुंदराबाई आजूबाजूला नसल्याचे पाहून अन्य महिला घाबरल्या. त्यानंतर त्यांनी गावात येऊन याची माहिती दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती दिली. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी ब्राह्मणे, क्षेत्रसाहाय्यक आदे, वनरक्षक केशव दडमल यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा त्यांना शिवणी वनपरिक्षेत्रात सुंदराबाईचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत दिली आहे.

वाघाच्या हल्ल्याच्या या दोन्ही घटना एकाच वनपरिक्षेत्रातील आहेत. त्यामुळे या परिसरातील वाघ मनुष्यप्राण्याच्या रक्तास चटावलेला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

चार जानेवारी रोजी शिवापूर (तुकूम) जंगलात सरपण गोळा करणाऱ्या नलू दिवाकर घोडमारे (वय 40) या महिलेवर वाघाने हल्ला केला. ती पेटगाव येथील रहिवासी होती. ही घटना घडत नाही तोच दुसऱ्याच दिवशी सात किलोमीटर अंतरावरील मोहाळी येथील सुंदराबाई आबाजी नन्नावरे (वय 50) महिलेचा बळी गेला. ही घटना शिवणी वनपरिक्षेत्रातील जामसाळा जंगलात घडली. हल्ल्याचे सत्र सुरूच असताना आज (ता. सहा) मंदा पटवारू तोरकपवार ही महिला ठार झाली. ती जंगलात सरपण गोळा करीत असताना दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला चढविला. तिला 10 कि. मी. अंतरावर ओढत नेले. वाघाच्या हल्ल्याच्या या तिन्ही घटना एकाच वनपरिक्षेत्रातील आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आता लवकरच तेंदूपत्ता आणि मोहफुलांचा हंगाम येईल. त्यावेळी हे हल्ले आणखी वाढतील, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. वाघाच्या हल्ल्यांच्या या तिन्ही घटना एकाच वनपरिक्षेत्रातील आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवणी वनपरिक्षेत्राचे अधिकारी बावणे यांनी जंगलातील गस्त वाढविली आहे. जंगलात नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.




तीन महिलांचा बळी घेणारा वाघ एकच आहे, हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. एकच वाघ नर असेल तर तो ज्या जंगल परिसरात राहतो, तिथे त्याचा ४० किलोमीटरपर्यंत वावर असतो. मादी असेल तर तिचे क्षेत्र १० ते १५ किलोमीटरपर्यंत असते. ज्या तिघांना वाघाने शिकार केले. जंगल विरळ असेल, तृणभक्षी जनावरे नसतील तर त्यांचा वावरण्याचा परिसरही वाढू शकतो. त्या तिन्ही घटनास्थळांचे अंतर एकमेकांपासून १७ किलोमीटर परिसराच्या आत असल्यामुळे हा एकच वाघ असावा, अशी शक्‍यता आहे.



नरभक्षक नव्हे, नरघातक!

वाघ नरभक्षक असेल तर माणसाला मारल्यानंतर तो खातो. भूक लागली असेल तरच तो हल्ला करतो. दूरवर ओढत नेऊन माती, पाने टाकून मृतदेह लपवून ठेवतो; मात्र काही वेळा वाघाने हल्ला केल्यानंतर तो त्या माणसाला खात नाही. निघून जातो. अशा प्रकारचा वाघ हा "नरघातक' या वर्गात मोडतो. गत तीन दिवसांत तिघांचे बळी घेणारा वाघ हा "नरघातक' आहे. तिघांचेही मृतदेह मिळाले आहेत.

व्याघ्रतांडव

मागील चार वर्षांत वाघांच्या हल्ल्यांत ६३ जणांचा बळी गेला. एका "नरभक्षकाला' वनाधिकाऱ्याने कंठस्नान घातले. मात्र, या जिल्ह्यातील नागरिकांना हिंस्र श्‍वापदांपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळू शकले नाही. छोट्या-मोठ्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून गत ७२ तासांत वाघांच्या हल्ल्यांत तीन महिला ठार झाल्यात. या घटनांमुळे सिंदेवाही परिसरात पुन्हा एकदा नरभक्षकाची कमालीची दहशत निर्माण झाली आहे


वाघाला पकडण्यासाठी "शूटर' मोहालीत


चंद्रपूर - 15 दिवसांत वाघाच्या हल्ल्यातील पाचवा बळी ठरलेल्या मोहाळी (ता. सिंदेवाही) येथील एकनाथ पैकाजी दांडेकर यांचा मृतदेह उचलण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्याने गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आणि पोलिस बंदोबस्तात शेवटी आज (ता. 17) अत्यसंस्कार करण्यात आले. या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी शुटरच्या दोन चमू शिवणी वनपरिक्षेत्रात दाखल झाल्या आहे. "ट्रॅंक्‍युलायझर' गनने बेशुद्ध करून वाघांना पकडण्यात येणार आहे.

मंगळवारी (ता. 16) रात्री मोहळी येथील एकनाथ पैकाजी दांडेकर या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मोहाळी येथील गत 15 दिवसांतील हा दुसरा बळी आहे. शेतात रखवाली करण्यासाठी गेलेल्या एकनाथने लगतच्या शेतातील मनोहर गायकवाड यांच्यासोबत रात्री साडेआठच्या सुमाराला जेवण केले. थोडावेळ गप्पा झाल्यानंतर ते आपल्या मचाणीकडे झोपण्यासाठी येत असताना तुरीच्या झाडांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. काही कळायच्या आतच त्यांच्या नरडीचा वाघाने घोट घेतला आणि पसारही झाला. या अचानक घडलेल्या घटनेने भांबावलेल्या शेजारच्या शेतातील मनोहर गायकवाड या शेतकऱ्याने आरडाओरड सुरू केली आणि लगतच्या शेतातील नागरिक धावून आले. रात्रीच ही वार्ता पंचक्रोशीत पसरली आणि जवळपास 10 ते 12 गावांतील नागरिकांनी आपला मोर्चा घटनास्थळाकडे वळविला. पहाटे चारपर्यंत शेतातच मृतदेह पडून होता. या दरम्यान शिकार सोडून निघून गेलेला तो वाघ पुन्हा शेतात आला. मात्र, लोकांनी आरडाओरड केल्याने तो माघारी फिरला.

नागरिकांच्या रोषाची कल्पना असल्याने वनविभागाचे अधिकारी इकडे फिरकलेच नाही. पहाटे चारच्या सुमाराला मृतदेह संतप्त नागरिकांनी नलेश्‍वर येथील वनविभागाच्या कार्यालयात ठेवला. जवळपास दोनशे लोकांच्या जमावाने या कार्यालयाला घेराव घातला. वाघाला मारण्याची परवानगी दिल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. यावेळी कार्यालयात वनाधिकारी उपस्थितीत नव्हते. वाघाला पकडल्याशिवाय मृतदेह उलचणार नाही, अशी नागरिकांची मागणी होती. त्यामुळे दिवसभर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. मोहाळीतील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. शेवटी दोनच्या सुमाराला पोलिसांनी मृतदेह उचलला आणि कुटुंबीयांना घेऊन अत्यंस्कार ओटोपले. दरम्यान, या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी शुटरच्या दोन चमूंना बोलविण्यात आल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. वाघाला पकडण्याचे लेखी आश्‍वासन वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले. त्यानंतर तणाव निवळला. नागपूर आणि चंद्रपुरातील ही चमू आहे. सोबतच मंगळवारी झालेल्या घटनास्थळावर पिंजरा आणि कॅमेरा लावण्यात येणार आहे. मृतकाच्या कुटुंबीयाला दहा हजारांची मदत करण्यात आली आहे. या आधीच शिवणी वनपरिक्षेत्रात वाघाला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे आणि दोन ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र, वाघ त्याला हुलकावणी देतच आहे. या घटना 17 किलोमीटर परिसराच्या आत घडल्या. त्यामुळे हा एकच वाघ असावा, अशी शक्‍यता वनाधिकाऱ्यांची आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.