पीसीपीएनडीटी
सल्लागार समितीची बैठक
नागपूर/प्रतिनिधी:
पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नागपूर शहरामध्ये चार नवीन सोनोग्राफी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (ता.३) धरमपेठ येथील मनपाच्या डिक दवाखान्यामध्ये सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत समितीच्या अध्यक्ष प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा ढवळे, मनपाच्या पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, मनपाचे अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. प्रशांत ओंकार, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, वीणा खानोरकर, डॉ. वासंती देशपांडे आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये नवीन सोनोग्राफी केंद्राच्या नोंदणीला मान्यता व जुन्या केंद्राच्या नुतनीकरणाच्या मान्यतेबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये चार नवीन सोनोग्राफी केंद्रांच्या मंजुरीसह सात सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणीचे नविनीकरण करण्यात येणार आहे.