Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जून ३०, २०१८

 चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.


गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा

विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा

 वनालगतच्या शेतातील विद्युत तारेचे कुंपन ठरतेय वाघासाठी 'काळ'


वीज प्रवाहामुळे  होणारे वाघांचे मृत्यु थाबविण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी*

*शेतपिक संरक्षणकरिता हवी प्रभावी उपाय योजना....
ताडोबा-बफरच्या धर्तीवर 'व्यक्तिगत सौर ऊर्जा कुंपन'
अनुदान तत्वावर पुरविण्याची मागणी...*


चंद्रपूर : विदर्भात वर्षभरात वीज प्रवाहामुळे मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे भविष्यातील व्याघ्र संवर्धनाची चिंता निर्माण झाली आहे. त्यावर वेळीच सावध होऊन योग्य उपाययोजना न केल्यास ही मोठी समस्या उभी राहील. विदर्भातील वाढती वाघांची संख्या आणी शेतपीक वाचविण्याकरिता शेतकरी बांधवांकडून होणारे प्रयत्न म्हणजे शेतकरी विरूध्द वाघ पर्यायाने वनविभाग असा नवा संघर्ष उभा होत आहे.



विदर्भात विदयुत प्रवाहामुळे होणारे वाघ मृत्यु ची त्वरित दखल घेऊन थाबविण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची मागणी एका निवेदनद्वारे वनमंत्री सुधीर मुुनगंटीवार यांच्याकडे इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. सोबतच वाघाचे मृत्यू आणि शेतपीक नुकसान थांबविण्याकरीता बफरच्या धर्तीवर ‘व्यक्तीगत पातळीवर सौर उर्जा कुंपन अनुदान तत्वावर’ देण्याची मागणी केली आहे.



मागील सप्ताहात 4 नोव्हेंबर 2017 ला चपराळा येथे रेडीओ काॅलर लावुन सोडण्यात आलेली वाघीण अशाच विदयुत प्रवाहाच्या धक्काने मारली गेली. 7 नोव्हे 2017 चिमुर वनक्षेत्रातील आमडी शेतशिवारातील वाघ मृत अवस्थेत आढळला. तिथेही विज तारेचे कुंपन लावण्यात आलेले होते. यासोबत मागील 13 आॅक्टोबर 2017 ला ब्रम्हपुरी येथुन सोडण्यात आलेली वाघीण सुध्दा शेतातील वीज प्रवाहाने बोर व्याघ प्रकल्प लगत वर्धा जिल्ह्यात मृत झाली होती. नागपुर जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना आहे. प्रसिद्ध श्रीनीवास वाघ रेडीओ काॅलर असलेला ब्रम्हपुरी वनविभागात 27 एप्रील 2017 रोजी मृत अवस्थेत आढळला. त्यापुर्वी मध्य चांदा कोठारी अंतर्गत 3 नोव्हे 2016 ला एक वाघ मेलेला आहे. यांनतर 3 डिसें 2016 ला बाजुच्या तेलगांणा राज्यात कागजनगर येथे मध्य चांदा वनविभागातुनच स्थलांतरीत झालेला वाघ सुध्दा तिथेही याच कारणानी मेला.



वरील काही घटनात वाघांना रेडीओ काॅलर असल्याने व कुणी माहिती दिल्याने या घटना बाहेर आलेल्या आहेत. जे वाघ विदयुत प्रवाहाने मृत झाले असतील आणि जमिनीत पुरले गेले असतील अशा काही घटना नाकारता येत नाहीत. वाघांसोबतच चंद्रपूरात 3 रानगवे एकसाथ विदयुत प्रवाहाने मेलेत, एका शेताच्या कुंपनात अनेक वन्यप्राण्यांचे हाडांचे सापळे काढण्यात आले यावरून तृणभक्षी प्राणी सुध्दा मोठया प्रमाणात मृत्युमुखी होत असल्याचे एकदंरीत चित्र आहे.



विदर्भातील शेतकरी कोरडवाहु शेती करणारा मोठा वर्ग आहे. जेमतेम एक पिकावर शेतकरीचे वर्षभराचे अर्थशास्त्र अवलंबुन आहे. उभे पिक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतक-यांकडून केले जाते. वन्यप्राण्यांपासून शेतपीक वाचविण्याकरीता शेतकरीकडुन अशा पध्दतीने तारेचे कुंपन शेताभोवती करून त्यात जिंवत वीज प्रवाह सोडला जातो. कारण, विदर्भातील शेतकरीची ‘अस्मानी आणी सुलतानी’ संकटातुन वाचलेले पिक वन्यप्राण्यापासुन वाचविण्याकरीता स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शेतात जिवंत वीज प्रवाह सोडतात. अशा चुकीच्या पध्दतीने आपला जिव जाईल, हे माहीती असताना सुध्दा असे प्रयत्न सुरू आहेत. विदयुत प्रवाहाने शेतकरीच मरण्याच्या घटना जिल्हयात व विदर्भात घडलेल्या आहेत. अशा चुकीच्या पध्दतीने विदयुत प्रवाह शेतात सोडणे हे नक्कीच समर्थनीय नाही. परंतु, ही सर्व धडपड वन्यप्राण्यापासून उभे पिक वाचविण्यासाठी असते. यावर विदयुत विभागाचे व वनविभागाचे कुठलेही नियंत्रण नसते. वाघांच्या शेतात येण्यावर सुध्दा कुणाचेच नियंत्रण नसल्याने अनेक वाघ आणी वन्यप्राणी मृत्युमुखी होत आहेत.





विदर्भातील वाढलेली वाघांची संख्या, त्यांचे होणारे स्थलांतर, स्थंलातर होताना वन्यप्राण्याचे भ्रमणमार्ग हे फक्त जंगल नसल्याने शेतशिवार, गावे, रस्ते-हायवे, नदया-नाले हे सर्व ओलांडुन पुढील वनक्षेत्राचा शेकडो किमीचा प्रवास पुर्ण करतात. तसेच वनव्याप्त गावातील शेती, वनालगत असलेले शेतशिवार म्हणजे येथे वाघांचा वावर असतोच. शेतशिवारातील पाळीव प्राण्याची शिकार करण्यास किंवा शेतशिवारात येणारे रानडुक्कर, निलगाय व इतर तृणभक्षी प्राणी यांची शिकार करण्यास वाघ येतो अशावेळी तिथे अशा पध्दतीने शेतक-याने तारेचे कुंपन करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात आलेला असल्यास तिथे वाघांसाठी धोका संभवतो. वनविभाग सोबतच विद्युत् विभागने अश्या घटना घडणार नाही, विजेचा चुकीचा वापर होणार नाहीं याकडे लक्ष देने अत्यंत गरजेचे आहे.