Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विद्यापीठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्यापीठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी

ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या होऊ घातलेल्या  महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीत, ब्रम्हपुरी तालुक्यात पाच महाविद्यालयाची निवडणूक दिनांक ११ जानेवारी २०१८ संपन्न झाली. या महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या युतीने ५ पैकी ४ जागेवर विजय संपादन करीत बाजी मारली. तर एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला समाधान मानावे लागले.
   सविस्तर वृत्त असे की, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुक पार पडली. यात ब्रम्हपुरी तालुक्यातील पाच महाविद्यालयाचा समावेश होता. यात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या युतीने शांताबाई भैय्या महिला महाविद्यालयातून मीनाक्षी घनश्याम नाकाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून अविष तुपकर, गंगाबाई तलमले महाविद्यालयातून संतोष रमेश पिलारे, शोभाताई बनसोड कला व वाणिज्य महाविद्यालयातून गोपाल अंतराम बारसागडे यांनी बाजी मारत ४ महाविद्यालयावर आपला झेंडा रोवला.
 तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ने. हि.महाविद्यालयातून प्रशांत राऊत  हा निवडून आल्याने एका जागेवर समाधान व्यक्त केले.या निवडून आलेल्या ४ विद्यापीठ प्रतिनिधीचे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाचे युतीचे मोंटू पिलारे, अनुकूल शेंडे, संजू मेश्राम, अमोल ठेंगरी,मिथुन चौधरी,शरद अंबादे, अंकुश मातेरे, विवेक रामटेके यांनी अभिनंदन केले.

रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव

अखेर ना. महादेव जानकर यांच्या लढ्याला यश... 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

नागपूर/संजय कन्नावार -
२००५ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकरांच्या नेतृत्वात सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यासाठी महामोर्चा काढला होता. १९९९ साली दिल्लीत धनगर आरक्षणासाठी पहिला मोर्चा महादेव जानकरांनी काढला होता. जानकर आज सत्तेत असले तरी ह्या मागण्यांसाठी असलेला त्यांचा हट्ट आजही कायम आहे. आज नागपूर मध्ये धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी या मागण्यांचा पुन्हा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांनी आजच सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर धनगरआरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. नामकरणाप्रमाणेच ना. जानकर धनगर आरक्षणासाठी लढा कायम ठेवतील, हा समाजाचा विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. महादेव जानकर यांचे धनगर समाजातर्फे सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याबद्दल स्वागत करण्यात आले.