Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुत्रीघर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुत्रीघर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

"मुत्रीघरासमोर प्रवासी बसतात बसच्या प्रतीक्षेत"

"मुत्रीघरासमोर प्रवासी बसतात बसच्या प्रतीक्षेत"

बसस्थानकनसलेल्या गडचांदूरची दुर्दैवी कथा...
गडचांदुर/ प्रतिनिधी:-
औद्योगिकशहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहर सद्या अतिशयबिकट स्थितीतुन समोर जात आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदुर शहराची ओळख हि औद्योगिकशहर म्हणून आहे. गडचांदूर जरीऔद्यागिक शहर असले तरीमात्र शहरांतील स्थानिकांना याठिकाणी जीवन जगण्यासाठी रोजविविध 
समस्यांनातोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण, शुद्ध पाणी,वाहतुक व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, हे तर याअसतात समस्या आहेतच मात्र "असून नसल्या"सारख्यासोयीत प्रकल्प असून बेरोजगारीचे संकट, धरणे असून पाण्याचे संकट, सुसाट बाईकर्सवर नियंत्रण नसल्याने जीवाचे संकट,यासारख्या अश्याकित्येक लहान मोठ्या संकटांना समस्याना सध्या गडचांदूरकर निमुटपणे सहन करीत आहे. यावर पुन्हा बस स्थानकच्या समस्येचीभर पडली असून हिसमस्या गडचांदूरच्या नागरिकांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे .

गेल्याकाही महिन्यानपुर्वी येथील मुख्य मार्गाचे काम सुरू होते. हे बांधकाम सुरु असतांना याठिकाणी पूर्वी असलेला जुना प्रवासी निवारातोडण्यात आला. तेव्हा पासुनअनेक प्रवासी अक्षरश: प्रसाधनगृहा समोर तसेच इतरठिकाणी बसुन बसची वाटबघत आल्याचे विदारक दृश्य गडचांदूरकर अनुभवत आहे  
स्थानिकनगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभात क्षेत्राच्या आमदार महोदयांनी  लवकरचभव्य सर्व सुविधायुक्त बस स्थानकची निर्मीतीकरण्यात येणार असल्याचे वक्तव्य भर कार्यक्रमात  केले होते.मात्र चारमहिने उलटून गेल्या नंतरही गडचांदूरकरांना मुत्रालयसमोरच प्रवासी बसची वाट बघतराहावे लागत आहे.
गेल्याकाही दिवसात या बसस्थानकासाठी  दोन जागेची पाहणी करण्यात आली . या पैकी एकजागा निश्चित करण्यात येत आहे .अंदाजेचार महिन्यांच्या कालखंडा नंतर ही बसस्थानकाचा मुहूर्त काही निघत नसल्याने  "आमदारसाहेब गडचांदुर बस स्थानकाचा मुहूर्तनिघणार तरी केव्हा? असाप्रश्न गडचांदूरकर  विचारातआहेत


सध्यामोठ्या बस स्थानकची निर्मितीहोईपर्यंत या मार्गाच्या दोन्हीबाजुला आधूनिक पद्धतीचा लहान प्रवासी निवारातरी उभारा,अशी मागणी नागरिकांचीहोती मात्र संबंधितांनी याकडे कानाडोळा करत प्रसाधनगृहाच्या बाजूलाचटिनाचे वाहतूक कार्यालय बनविले मात्र प्रवासीनीवाऱ्याला इतके महत्व दिलेनाही.याच मुत्रीघराच्या जवळवाहतूक नियंत्रक यांचे कार्यालय आहे मात्र ईथलीपरिस्थिती बघता बस स्थानाकनसल्याने  शाळकरीमूले सर्व प्रवासीउन्हाचे चटके सहन करतइकडे -तीकडे उभी दिसतात. यामूळेअनेक वृद्धांना विशेषत: लहान मुलं सोबतअसलेल्या महिलांना कमालीचा शारीरिक मानसिक त्राससहन करावा लागत आहे.त्यामुळेप्रवाश्यांची धडपड संबंधितांनी लक्षातघेऊन उद्धभवलेली बस स्थानकची समस्यात्वरित मार्गी लावावी अशी एकमुखी मागणीनागरिकांनी केली आहे.लवकरातलवकर असे झाल्यासगडचांदूरकर संबंधितांना त्यांची जागा दाखविल्या शिवायराहणार नाही असा सूरऐकायला मिळत आहे .