Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मकरसंक्रांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मकरसंक्रांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जानेवारी १४, २०१८

जाणून घ्या काय आहे मकरसंक्रांतीचे महत्व

जाणून घ्या काय आहे मकरसंक्रांतीचे महत्व

मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.

मकरसंक्रांतीस यात्रा 
मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरिज गंगासागर येथे, कोलकाता शहरानजिक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते.

पुराणातील उत्तरायण
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.


मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातूनउत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.

भोगी

संंक्रांंतीचा आदला दिवस भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगभाज्या, फळभाज्या यांंची तीळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्व विशेष आहे.थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.


महाराष्ट्रातील संक्रांत

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

पंढरपूरमधील संक्रांत
नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा आजचा मकर संक्रांत …. या दिवशी तीळ -गुळा बरोबरच महिलांसाठी सौभाग्याचा मानला जाणार्‍या सणा पैकी एक म्हणजेच मकर संक्रांत . या दिवशी भोगी करणे , वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती , परंंपरा आजही जोपासल्या जात आहे . पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात सकाळ पासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून येते. रूमिणी माता मंंदिरात महिला एकमेकीना वाण - वसा मोठ्या श्रद्धेने देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

तीळवण व बोरन्हाण

नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे.तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते.हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.
लहान बालकांंनाही संंक्रांंती निमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे, हलव्याचे दागिने घालणे अशी पद्धती दिसून येते.चुरमुरे,बोरे,हरभरे,ऊसाचे तुकडे,हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर घातले जाते.अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्कीटे घालण्याची हौसही दिसते.

प्रादेशिक विविधता


पूर्व भारतातील संक्रांत
संक्रात समग्र दक्षिण पूर्व आशिया मध्ये थोडा स्थानिक फेरफार सोबत साजरी करतात.
गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहूबाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
  • दक्षिण भारतात,
    • कर्नाटकआंध्र प्रदेश - (संक्रांति)
    • तमिळनाडू - पोंगल(Pongal)
    • दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात.सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गुळ, दुध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
    • शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.  
  • भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
  • नेपाळमध्ये,
    • थारू (Tharu) लोक - माघी
    • अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti) के माघ सक्राति (Maghe Sakrati)
  • थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
  • लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
  • म्यानमार - थिंगयान (Thingyan)


पतंग

यात्रा

मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा. हा दर बारा वर्षांनी हरिद्वारप्रयागउज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरीज कोलकाता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित केली जाते.
या दिवशी केरळमधील शबरीमाला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.
गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.

पुराणातील उत्तरायण

महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला.. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.