नागपूर/विशेष प्रातिनिधी:
आजवर आपण मुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या ऐकले किव्हा वाचले असाल मात्र हिरव्या मंडपापाई लग्न तुटल्याचे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल.
चंद्रपुरातील वरोरा शहरात हिरव्या मंडपामुळे लग्न तुटल्याचे समोर आले आहे.नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघेही उच्चशिक्षित मुलगा मुंबईत रेशनिंग अधिकारी तर मुलगी छत्तीसगड राज्यात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे,काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाला आणि १२ मे ला लग्न ठरले,आधल्या दिवशी दोघांना हळदही लागली. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, नवरदेवाने आधल्या दिवशी नवरीला फोन वरून गोंडी रिवाजानुसार हिरवा मंडप घालण्याचा आग्रह केला. आणि लग्न हे हिरव्या मांडवात होणार असल्याचे सांगितले,हे ऐकून नवरीने नवरदेवाच्या या शुल्लक मागणीवरून चक्क नकार देत लग्नच तोडून टाकले.
चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभूर्ण्यापासून सात किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथे चार दिवसांपूर्वी सोयाम आणि आत्राम कुटुंबाच्या लग्नाची बातमी देशभर चर्चेचा विषय ठरली.या कुटुंबियांच्या निर्णयाने अनेकांनी त्यांचे कौतुकही केले. नवरी ऑक्सिजनवर दवाखान्यात भरती असतांना दोन्ही पक्षाने एकमेकांना धीर देऊन मधला मार्ग काढत चक्क अॅम्ब्युलन्स मांडवात आणली आणि आलेल्या वऱ्हाडी परत जाऊ नये,व लग्नाला वेगळे वळण लागू नये म्हणून मुला-मुलीचा विवाह सोहळा पार पडला. मात्र त्याच चंद्रपुरातील वरोरा शहरात हिरव्या मंडपाच्या शुल्लक कारणावरून लग्न तुटल्याची संतापजनक घटना घडली. या घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही परिवारांची चांगलीच बदनामी झाली.हे प्रकरण इथेच थांबले नाही तर थेट वरोरा पोलिसात पोहचले.पोलिसांनी व जेष्ठ मंडळींनी दोन्ही बाजू ऐकून घेतली व तोडगा काढायचा प्रयत्न केला. मात्र एक दिवस आधी आम्ही शहरात हिरव्या मंडळाची मागणी कशी पूर्ण करणार असे सांगत वधूने लग्नास नकार दिला. शिवाय हि अट पूर्ण केली असती तर अशीच मागण्यांची मालिका सुरू राहिली असती त्यामुळे आपण लग्नाला ठाम नकार दिल्याची प्रतिक्रिया वधुने दिली आहे. तर दुसरीकडे नवरदेवाने आपण कुठलीच डिमांड केले नसल्याने आणि फक्त आदिवासी प्रथेप्रमाणे हिरव्या मंडप घालण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. हिरवा मंडप हा आदिवासी समाजात प्रतीकात्मक आहे मात्र मुलीकडच्या पक्षाने याचा बाहू केला आणि प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत नेले. असा आरोप नवरदेवाने केला या संपूर्ण प्रकारामुळे आमची बदनामी झाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
यात नवरदेवाने आपल्या सोबत आणलेल्या पाहुण्यांना स्वताकडून वेळेवर जेवण दिले.यावेळी आम्हाला आर्थिक तसेच मानसिक त्रास झाला असल्याचे त्यांनी सांगितले.नवरीच्या या निर्णयामुळे ना-ना विविध शंका निर्माण होत आहे.उच्चशिक्षित लोकच जर असा निर्णय घेतली तर अनाडी लोकांनी काय करावे असाच प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).