Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुडून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बुडून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१८

चंद्रपुरात अस्थी विसर्जनासाठी गेलेले चौघेजण बुडाले

चंद्रपुरात अस्थी विसर्जनासाठी गेलेले चौघेजण बुडाले

२ जणांना वाचविण्यात यश;दोघांचा शोध सुरू
ललित लांजेवार:
मित्राच्या आईच्या अस्थीविसर्जन कार्यक्रमासाठी गेलेल्यांपैकी ४ जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहराजवळ असलेल्या वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगम असलेल्या वढा तीर्थक्षेत्र येथे  चंद्रपुर येथील रहिवासी नितीन गोवर्धन यांची स्व.चंद्रभागा शंकर गोवर्धन यांच्या  अस्थीसर्जनासाठी जवळपास २५ ते ३० लोक गेले होते.
यातील बाबुपेठ येथील रहिवासी असलेले केतन भोजराज पोटदुखे 20, विक्की शंकर माहुलीकर 27, उत्तम सातोबा टेकाम 38, नैनेश शाहा 27  एकूण ४ लोक हे अस्थीविसर्जनानंतर आंघोडीला हे नदीपात्रात उतरले होते.हे चौघेही प्रथमतःपाण्यात वाहून गेले मात्र उत्तम सातोबा टेकाम व नैनेश शाहा यांना उपस्थित लोकांच्या मदतीने वाचविण्यात आले,
 चंद्रपूर येथील पोलीस विभागाला मदत मागून बचाव कार्यासाठी बोट बोलविण्यात आली व नंतर शोधकार्य सुरू करण्यात आले. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. असून पुढील तपास घुग्गुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले पिएसआई राहुल ठेंगने व यांच्या चमू मार्फत सुरू आहे.