रामटेक/प्रतिनिधी
भारतीय जनसेवा मंडळ रामटेक तर्फे वैकुंठ चतुर्दशी निमित्त दरवर्षीप्रमाणे शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शेतकरी आत्महत्येचा देखावा करणारा कलाकार मनोज अरुण धुर्वे रा. नवरगाव हा इतर 4-5 कलाकारांसोबत आळीपाळीने रोल करत होता. दरम्यान त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखान्यात नेले असता डॉ नी मृत घोषित केले.
दरम्यान देखाव्या दरम्यान फास लागून मनोज चा मृत्यू झाला अशी अफवा सोशल मीडियावर पसरली.
परंतु वस्तुस्थिती तशी नसून, मृतदेहाचे पोस्ट मॉर्टेम करण्यात आले आहे व डॉ नी गळफास लागून मृत्यू झाला नसल्याचे व पुढील तपासण्या झाल्यानंतरच मृत्यूचे नक्की कारण कळविण्यात येईल असा अंतरिम अहवाल दिलेला आहे.
सदर मर्गचा सखोल तपास पोनि रामटेक योगेश पारधी व PSI बोरसरे हे करीत असून डॉ च्या अहवालाची प्रतीक्षा आहे.


