Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

प्रेरक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेरक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

मला माझे असे कोणी नाही. मनावर खूप ताण येतो आहे.

मला माझे असे कोणी नाही. मनावर खूप ताण येतो आहे.

 तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही,अशी भीती कधीच बाळगु नका.

कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते.

तुम्हाला असं वाटत असंल, की तुमच्यावर कोणीच प्रेम करीत नाही, तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की तुमच्यावर प्रेम केलं जातं आहे! ही पृथ्वी तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तिनं तुम्हाला धरून ठेवलं आहे. पृथ्वीचं तुमच्यावरचं प्रेम म्हणजे गुरुत्वबल. हवाही तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तुम्ही झोपलेले असतानाही ती तुमच्या फुफ्फुसांतून वाहत असते. देवही तुमच्यावर मनापासून, अगदी हृदयापासून प्रेम करतात. एकदा तुमच्या हे लक्षात आल्यावर तुम्ही स्वतःला कधीही एकटे समजणार नाही.

मला माझे असे कोणी नाही. मनावर खूप ताण येतो आहे.

तुम्हाला एकटेपणा जाणवत असल्यास तुम्ही केवळ नैराश्‍यच पसरवाल. त्यातून तुम्ही अधिक एकटे पडाल! विचार करा, तुम्हाला तुमची स्वतःची साथच कंटाळवाणी वाटत असल्यास इतरांचं काय? लोक आनंदोत्सव साजरे करण्याच्या मागं धावत असतात. मात्र, यातून तुमच्यात एकटेपणाची भावना निर्माण होईल. त्याउलट तुम्ही स्वतःच्याच सानिध्यात आनंद उपभोगत असल्यास आनंदोत्सव तुमच्या भोवती गर्दी करतील.

लोकांच्या गराड्यात असणाऱ्या व्यक्ती एकांतपणाच्या शोधात असतात, तर एकांतवासातील व्यक्ती गर्दी शोधत असतात. प्रत्येक जण या दोन्हीत समतोल साधण्याच्या प्रयत्नात असतो. हा समतोल आपल्याला स्वतःमध्येच सापडतो. तुम्ही स्वतःसाठी काही वेळ, वर्षभरातील एखादा आठवडा, काढून तुमचेच विचार आणि भावभावना जाणून घ्या. त्यातून तुम्हाला मनःशांती म्हणजे काय हे समजेल.

मदर तेरेसा आणि आचार्य विनोबा भावे आयुष्याच्या शेवटी अंथरुणाला खिळून होते. तुम्हाला काय वाटतं, त्यांना साथ देण्यासाठी त्या वेळी कोणीही नव्हतं? लोक या दोघांनी त्यांच्या भल्यासाठी केलेल्या कामांच्या बदल्यात त्यांची काळजी घेण्यासाठी उतावीळ होते. सेवा हेच तुम्ही आयुष्याचे एकमेव ध्येय ठेवल्यास तुमच्यातील भीती दूर होईल, मन एकाग्र होईल आणि कृतीमध्ये नक्की उद्देश येईल. तुम्ही उदास, दुःखी आणि एकटे असता, तेव्हा तुम्ही तुमच्यातील मर्यादांच्या संपर्कात असता. या क्षणी तुम्ही सर्वांचे आभार माना आणि शांततेसाठी प्रार्थना करा. यातून तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल आणि कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी त्यातून तुम्ही सहीसलामत बाहेर पडण्याचे बळ तुम्हाला मिळेल.

हर घडी बदल राही है रूप जिंदगी.. छाव है कही, कही है धूप जिंदगी..

हर पल यहा जी भर जियो… जो है समा.. कल हो न हो…!!!

मित्रा तु एकटा नाहीस, कधीही हाक मार.मी एकटा आहे, मला कोण नाही हे मनातुन काढुन टाक.

अपना हर दिन ऐसे जियो…

जैसे के आखरी हो..!!!

जियो तो इस पल ऐसे जियो..

जैसे के आखरी हो..!!



Quora link : http://bit.ly/3cJ5OJX

Anil patil यांनी दिलेले उत्तर