Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

प्राथमिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्राथमिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७

चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात निर्णय घेऊन न्याय प्रदान करण्यात यावा, या करीता आज चंद्रपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक/शिक्षण विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार केला.समक्ष भेटून चर्चा केली. मात्र या प्रश्नांचे मार्ग अद्यापही निघाला नाही.

             वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करावा.शिक्षकांना करावी लागणारी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करून केन्द्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी. नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीला लागलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.  MSCIT परीक्षेची अट रद्द करण्यात यावी. विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. अश्या विविध मागण्यांना घेऊन आज जिल्ह्यातील सर्व  प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.

.