Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पोटनिवडणुक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोटनिवडणुक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, एप्रिल ०७, २०१८

पोटनिवडणुकीत भाजपला धक्का;अपक्ष उमेदवार रंजिता आगदरी विजयी

पोटनिवडणुकीत भाजपला धक्का;अपक्ष उमेदवार रंजिता आगदरी विजयी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस येथील वार्ड क्रमांक  १,३,व ६  पंचायत समिती गणाच्या पोट निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले,याचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला.या निवडणुकीत भाजपला चांगलाच हादरा बसला आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगडे ह्यांचे हे मळ गाव आहे. 
 देवराव भोंगडे हे राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.  भारतीय जनता परतीच्या तत्कालीन पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या या गणासाठी हो पोटनिवडणूक घेण्यात आली होती अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखील असलेल्या या गणासाठी भाजप कडून नीळा चीवंडे,कोन्ग्रेस कडून आशा आवळे तर शिवसेन व राष्ट्रवादी कोन्ग्रेस पार्टीकडून आर. पी. आय समर्थित रंजिता आगदरी यांना उमेदवारी देण्यात आली होती.  यात  रंजिता आगदारी विजयी झाल्यात, या अगोदर हि जागा भाजपच्या शालू शिंदेकडे होती त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्यासाठी हि लढत प्रतिष्ठेची होती. सर्व ठिकाणी सत्ता काबीज करू अस म्हणणारे भाजपच्या नेत्यांना या पराजयामुळे बोध घेण्याची गरज आहे  माञ इथ कांग्रेस दुस-या क्रमांकावर तर  भाजप तिस-या गेली आहे. या निवडणुकीसाठी फक्त ३७ टक्केच मतदान झाले होते