Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

तळोधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तळोधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, एप्रिल १२, २०१८

१० रुपयाचे आमिष देत २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

१० रुपयाचे आमिष देत २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापुर येथे  क्रूरकृत्याची परिसीमा गाठल्याची घटना समोर आली आहे. तळोधीतील ८  वर्षाच्या व ६ वर्षाच्या दोन शालेय मुलीवर १०- १० रुपयाचे आमिष दाखवून लागोपाठ बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
 तिलकचंद अग्नीकर वय ५५ वर्षे असे या नराधमाचे नाव आहे.  हि घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.   घराजवळ राहणाऱ्या दोन मुली शाळेतून आल्यानंतर खेळत असताना हा सर्व प्रकार घडला.यातील एका मुलीचे वय ७ वर्षे असून ती पहिल्या वर्गात शिकते,  तर दुसरीचे वय ८ वर्षे असून ती तिसऱ्या वर्गात शिकत असून या दोनी मुली बाळापूर येथील जिल्हा परिषद  येथे शिकत होत्या. मंगळवारी सकाळच्या दरम्यान या दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या व दुपारच्या सुमारास ते आंगणवाडीच्या आवारात खेळत होत्या दरम्यान आरोपी तिलकचंद ने त्या दोघींना आईस्क्रीम खाण्याकरिता १० - १० रुपयाचे आमिष दाखवून त्या दोघांचा हात पकडून नजीकच बांधकाम सुरु असेलल्या बाथरुममध्ये नेले व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.त्यानंतर हा सर्व घडलेला प्रकार मुलींनी आपल्या आईवडिलांना सांगितला.हा प्रकार ऐकताच घरच्यांना काय करावे सुचेनासे झाले, घरचांनी लगेच पोलीस ठाणे गाठत या संपूर्ण प्रकारची तक्रार दाखल केली. व तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत नागभीड पोलिसांनी आरोपीला अटक केली.वृत्त लिहित परियंत या आरोपीला वैद्यकीय तपासणी करीता चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असून पुढील तपास सुरु आहे. संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तपास अधिकाऱ्यांना संपर्क साधले असता संपर्क होऊ शकला नाही.

शनिवार, फेब्रुवारी ०३, २०१८

 वाघिणीचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत;दहा दिवसात दुसरी घटना

वाघिणीचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत;दहा दिवसात दुसरी घटना

 तळोधी/प्रतिनिधी: 
तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनविभागात चांगलीच खडबड उडाली आहे. सदर घटना हि शनिवारला दुपारच्या सुमारास उजेडात आली. मृत वाघीण हि कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने नेमका वाघिणीचा मृत्यू कशाने झाला हे अजूनही समजू शकले नाही. चंद्रपूर जिल्हा हा पत्तेदार वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात वाघांचे सर्वात जास्त प्रमाण आहे.या वाघिणीचा मृत्यू हा जवळ पास ७ ते ८ दिवसा अगोदर झाला असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविल्या जात आहे .गेल्या काही दिवसा अगोदर येथून जवळचा असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती.याच घटने पासून तब्बल १०  दिवसातच जवळच असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.  त्यामुळे  वारंवार होत असलेल्या वाघांचा मृत्यू वनविभागाच्या चांगलाच जिव्हारी लागू शकतो. मिळालेल्या  माहिती वरून वाघाचा मृत्यू हा नैसर्गिक रित्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती होताच वनअधिकारी व वनकर्मचारी यांचा ताफा घटना स्थळी पोहचला मात्र तो परियंत अंधार पडला असल्याने वाघिणीचे  शवविच्छेदन होऊ शकले नाही , त्यामुळे रविवारला या  वाघिणीचे शवविच्छेदन होणार असल्याची माहिती वनधिकारी यांनी दिली.त्यामुळे वाघिणीचे मृत्यूचे नेमके कारण काय ? हे अजूनही कळू शकले नाही.