Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जिल्हाधिकारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिल्हाधिकारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ऑगस्ट २१, २०१८

चंद्रपूर पोलीस मुख्यालय येथे शांतता समिती व गणेश मंडळ पदाधिकारी यांची बैठक संपन्न

चंद्रपूर पोलीस मुख्यालय येथे शांतता समिती व गणेश मंडळ पदाधिकारी यांची बैठक संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:

आगामी बकरी ईद आणि गणेश उत्सव निमित्त्याने पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे जिल्हा शांतता समिती तसेच जिल्हयातील मुस्लिम समाजबांधव, मौलाना आणि गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक दि. 20/08/2018 रोजी डिंल शेड पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे आयोजीत करण्यात आली होती.
सदर कार्यकम्रास अध्यक्ष म्हणुन श्री. कुणाल खेमणार जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्हा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्याचप्रमाणे श्रीमती अंजली घोटेकर महापौर चंद्रपूर मनपा, श्री. शेंडे, सहायक धर्मदाय आयुक्त, श्री. महेश्वर  रेड्डी , पोलीस अधीक्षक चंद्रपुर, सहायक मनपा आयुक्त श्री. बेहरे, श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. सुशीलकुमार नायक उप विभागिय पोलीस अधीकारी चंद्रपूर शहर, एसडीपीओ. श्री. विलास यामावार, एसडीपीओ. श्री. प्रशांत परदेशी, एसडीपीओ. श्री. विशाल हिरे, एसडीपीओ. श्री.
शेखर देशमुख, तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य व जिल्हयातील गणेश मंडळाचे पदाधीकारी तसेच सदस्य उपस्थितीत होते. सदर कार्यकम्रामध्ये आगामी बकरी ईद आणि गणेश उत्सवासंबंधाने मार्ग दर्शन करण्यात आले.
गणेश सभामंडपाच्या रोषणाई करीता लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वायरची जुळणी ही अतीशय थातरु मातुर स्वरूपात केलेली असतात तेव्हा ही इलेक्ट्रिक  वायरची जुळणी अपघात होउ नये या दृश्टीणे योग्य प्रकारे मंडळाच्या सदस्यांनी करून घ्यावी तसचे आय. एसआय. मार्क  असलेले विदयुत उपकरणे वापरावे.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्हा आणि पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी  यांनी मोलाचे मार्ग दर्शन सदर बैठकिस केले. आगामी  बकरी ईद आणि  गणेश उत्स्वव हा कश्याप्रकारे  मंगलमय शांततेत आणि सौदार्हपुर्ण वातावरणात साजरा होईल यावर त्यांनी आपले भरीव मार्ग दर्शन सर्व मंडळानां केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुणाल खेमणार, यांनी मंडळांना आपले मंडळ नोंदणीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणल्या जाईल या बाबत आष्वस्त केले. सोबतच मंडळांनी आपले देखावे सकारात्मक ठेवुन गोळा होणार्या  निधीतुन सार्वजनीक उपक्रम राबविण्याकरीता प्राधान्य दयावे असे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी  आणि श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर  यांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवीत मंडळांनी हा उत्सव साजरा करावा तसेच ध्वनी प्रदुषणच्या बाबतीत मा. उच्च  न्यायालयाने  दिलेेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन गणेश मंडळानी कोणत्याही  परीस्थितीत कायदयाचे व सामिजिक स्वास्थाचे उल्लंघन होणार नाही याची विषेश खबरदारी घ्यावी असा संदेश पोलीस अधीक्षक
यांनी दिला. सदर कार्यकम्राचे प्रास्ताविक अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांनी केले  असनु कार्यकम्राचे संचलन पाे नि. श्री. जयवंत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास  जिल्हा शांतता समिती सदंस्यांसोबतच मोठया संख्येने गणेश मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा शांतता समिती सदस्य, ईकाे-प्राे संस्था पदाधिकारी सदस्य, वाल्मीकी मच्छीमार संस्था सदस्य उपस्थित होते.

शनिवार, जुलै २८, २०१८

चंद्रपूरकरांचे प्रेम मी कदापी विसरू शकत नाही:आशुतोष सलिल

चंद्रपूरकरांचे प्रेम मी कदापी विसरू शकत नाही:आशुतोष सलिल

True joy in the service of the general public | सामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंदचंद्रपूर/प्रतिनिधी:
 सर्वसामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद आहे़ जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर स्नेह दिला़.हे मी कदापि विसरू शकत नाही, अशी भावना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व्यक्त केली़ स्थानांतरानंतर उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यापूर्वी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे तर प्रमुख अतिथी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, अ‍ॅड. रवींद्र भागवत, माजी कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार, प्राचार्य राजेश इंगोले, मनोवेध प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय बदखल, प्रशांत आर्वे आदी उपस्थित होते. चंद्रपूरचे प्रेम कधीच विसरणार नाही, वेगवेगळ्या पदांवर काम करीत असताना बराच काळ येथे सेवा देता आली. त्यामुळे ऋणानुबंध जुळल्याची भावना सलिल यांनी व्यक्त केली़ जिल्ह्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक पर्यावरण, वन्यजीव क्षेत्रातील विविध समस्या आणि विकास कामांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सलिल यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती़ उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकरी अधिकारी आणि जिल्हाधिकारी या तिन्ही पदावर कार्यरत राहुन त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला होता. सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला, असे मत देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. भागवत, डॉ. आर्इंचवार, पाऊनकर, प्राचार्य इंगोले यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक मनोवेधचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. यावेळी संजय धवस, किसन नागरकर, शैलेंंद्र राय, संतोष कुचनकर, गिरीश बदखल, मनोज साळवे, अविनाश देव उपस्थित होते़.

सोमवार, जुलै १६, २०१८

31 जुलैपर्यंत खरीप पिक कर्ज वाटपाची कारवाई करण्याचे बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

31 जुलैपर्यंत खरीप पिक कर्ज वाटपाची कारवाई करण्याचे बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पिक कर्ज साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 राज्य शासनाने शेतकऱ्यांना या हंगामामध्ये खरीप पीक कर्ज वाटप करण्याबाबत बँकाँना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तथापि, काही बँका यामध्ये मागे पडल्या असून या बँकांनी येणाऱ्या काळामध्ये तातडीने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावेत, असे स्पष्ट निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री.कुणाल खेमणार यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात जिल्ह्यातील बँकेच्या प्रमुख समन्वयकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. सदर बैठकीमध्ये सर्व बँकांनी उद्दिष्टाप्रमाणे 31 जुलै 2018 पर्यंत जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याचे सूचित करण्यात आले. 31 जुलैपर्यंत कर्जवाटप करण्याकरता काही उपायोजना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविल्या. यामध्ये 24 जुलैला मंगळवारी प्रत्येक बँकेच्या शाखेमध्ये खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात बँकांनी नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. तालुका समन्वय समितीने गावपातळीवर समन्वय करण्याबाबत स्पष्ट केले आहे. कर्जमाफी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारा, नमुना 8अ, आधार कार्ड, तर कुठल्याही अनुषंगिक कागदपत्राची कमतरता असल्यास महसूल विभागाने लक्ष घालण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असल्याने तसेच सदर पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जुलै 2018 असल्याने जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे. कर्जवाटपाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती गठित करण्यात आलेली असून सदर समितीमार्फत तालुका मेळाव्याचे नियोजन तसेच शाखानिहाय पीक कर्जवाटप व समन्वय समिती मार्फत केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाखांना 24 तारखेला पिक कर्ज वाटपाचे फक्त काम करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.

मंगळवार, एप्रिल २४, २०१८

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होता कामा नये-जिल्हाधिकारी
विविध राजकीय पक्ष व प्रमुख अधिका-यांची बैठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक 21 मे 2018 रोजी होत आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक होत असून त्यासाठी प्रशासनाने आज सर्व अधिकारी तसेच राजकीय पक्षांना या निवडणुकीची माहिती दिली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही. याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
            राज्यात रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बिड, परभणी-हिंगोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघामध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेल्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हयातील सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते. दुसरी बैठक दुपारी 3 वाजता राजकीय पक्षांची घेण्यात आली. या बैठकीला जिल्हयातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पार्टी, सीपीआय, बहुजन समाज पार्टी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.
            या बैठकीमध्ये उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे पाणी टंचाई संदर्भात सुरु असणा-या कामांमध्ये कुठलाही अडथळा नसेल असे स्पष्ट करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या नियमित बैठकांमध्ये आचार संहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. जुनी सुरु असलेली कामे बंद करु नये, मात्र आवश्यकता नसलेली व निवडणुकीवर प्रभाव टाकणारी कामे नव्याने सुरु करु नये. तसेच पदाधिका-यांना वाहने देण्यात येवू नयेत, कोणतेही भूमिपुजन, शुभारंभ अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतचे सदस्य मतदान करणार आहेत. सदर निवडणुकीच्या संबंधाने कोणतीही तक्रार असल्यास दुरध्वनी क्रमांक 07172-270322 वर संपर्क साधावा.

मंगळवार, जानेवारी ०२, २०१८

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज चंद्रपूर येथे सर्वपक्षीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक झाल्याने भिमा कोरेगाव गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास १५० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी केलेल्या गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित समाज जातो. मात्र या कालावधीत दलित समाजातील बांधवांवर कधीच हल्ला कोणी केला नाही की त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये एका परदेशी प्रसार माध्यमातील वेबसाईटने भिमा कोरेगांवच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द केली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पहिल्यांदाच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
      अचानक दुपारी एकच्या दरम्यान भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या गच्चीवरून समाजकंटक दगडफेक करून पळून जात होते त्यांना काही महिलाही अटकाव करण्यात पुढे आल्या की ते लोक लपुन पळून जात हीच स्थिती वढू गावातही होती. या घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला तसेच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या करिता सर्वपक्षीयांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन हि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.