गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतुन प्रियंका संतोष पिंपळकर हिने प्रथम श्रेणी प्राप्त करत गोल्ड मेडल मिळविले आहे तिच्या या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठातर्फे नुकताच तिचा सत्कार करण्यात आला असून यावेळी केंद्रीय भुपृस्ट महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिला गोल्ड मेडल प्रधान करण्यात आला. चंद्रपूर येथील बाबूपेठ परिसरात राहणा-या प्रियांकाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात तिने आय.ए.एस. बनण्याची इच्छा प्रकट केली आहे. ती सर्वसाधारण कुटुंबातुन असून तिचे वडील संतोष पिंपळकर हे सुतार कारागीर असून मिळेल ते काम करून आपल्या मुलीचे शिक्षण करीत आहे. खर तर ती सुतार समाजातील असून त्यामुळे तिच्या या यशाला सुतार समाजात व जिल्ह्याभरातअधिक महत्व प्राप्त झाले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गोंडवाना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गोंडवाना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा