Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कॅन्डल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कॅन्डल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, एप्रिल १७, २०१८

 कठुआ,उन्नाव प्रकरण;नागपुरात कॅन्डल मार्च.बघा विडीओ

कठुआ,उन्नाव प्रकरण;नागपुरात कॅन्डल मार्च.बघा विडीओ



Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor
चंद्रपूर /प्रतिनिधी:
देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा कायद्यात कठोर शिक्षा व्हावी  या मागणीसाठी नागपुरात फुटाळा तलाव येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते, कठूआ येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात कॅन्डल मार्च निघत आहे. देशातील लाखो नागरिकांप्रमाणे आपल्याला वेदना झाल्या. ज्याप्रमाणे महिलांना वागणूक मिळत आहे. यापुढे मिळता कामा नये. हिंसाचाराच्या विरोधात आणि न्यायाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या कॅन्डल मार्चमध्ये सामील व्हा असे आव्हाहन गेल्या २ दिवसापासून जिल्ह्यात  सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात होते. यात whatsapp चा जास्त वापर करून जास्तीत जास्त लोकांपारीयंत हा कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हा असे आव्हाहन करण्यात आले होते, त्यामुळे यात शहरभरतील तरुण तरुणाई,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,हा कॅन्डल मार्च परिसराच्याप्रमुख मार्गावरून निघाला.यात हजारोच्या संख्येने नागपूरकर तरुण तरुणाई,महिला पुरुष we want justice म्हणत हाक देण्यात आली