Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

एेतिहासिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एेतिहासिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जून १८, २०२१

सेनापती संताजी घोरपडे

सेनापती संताजी घोरपडे

 सेनापती संताजी घोरपडे


फेसबुक लिंक http://bit.ly/3gLaTDa

संताजी घोरपडे व धनाजी जाधव व सकल महाराष्ट्र आपले सर्वस्व उधळीत होते लक्ष एकच होते औरंग्याला महाराष्ट्रातुन जिवंत जावू द्यायचा नाही छत्रपति संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर सकल महाराष्ट्र पेटुन उठला : हंबीरराव मोहिते : संताजी घोरपडे : धनाजी जाधव: बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनि राजाराम महाराज व ताराराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा व महाराष्ट्र एक होवून लढला आणी शेवटी दिल्ली चे तक्त सोडून महाराष्ट्रावर चालुन येणार्या औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाठला हा इतिहास मराठ्यांचा आहे. 

सेनापती संताजी घोरपडे,Senapati Santaji Ghorpade
(फोटो : कुरूंदवाड घाट समाधी)

छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर असताना जुलमी झुल्फिकार खानाने किल्ल्याला वेढा घातला होता. त्यामुळे महाराज किल्ल्यावर अडकले होते. त्यावेळी महाराजांना सोडवण्याची जबाबदारी मराठा सरदार संताजी घोरपडेने स्वीकारलेली होती. त्या काळात संताजी आणि धनाजी असा काही पराक्रम गाजवत होते की, औरंगजेबानेही त्यांचा धसका घेतलेला होता. मोगल सैन्याला तरजळी स्थळी काष्ठी पाषाणी हे सरदार दिसायचे. घोडे जर पाणी प्यायले नाही तर त्याने दोघांचा धसका घेतला असावा, असे बोलले जायचे. संताजी जिंजिला जात आहे हे समजल्यानंतर औरंगजेबाने कपटी कासीम खानला मोठ्या फौजेसह पाठवले. कासीम राक्षसी महत्त्वाकांक्षेने आला होता. त्याच्याजवळ 60 हजारांचे सैन्य होते. पण संताजीच्या गनिमी काव्याने त्याला सळो की पळो करून सोडले. राजाराम महाराज जिंजिवरून सुखरुप सुटले. त्यानंतर जिंजिचा किल्ला झुल्फिकार खानाने जिंकला. पण छत्रपती मात्र त्याच्या तावडीत अडकले नाहीत. मराठेशाहीवर आलेले मोठे संकट टळले. 

औरंगजेबाची मूळ छावणी तुळापुर ते वडू कोरेगाव पर्यंत पसरलेली होती...लाखोंची फौज औरंगजेबाच्या दिमतीला होती.. त्यात अनेक मराठी सरदारही सामील होते...तुळापुर ते वडू एवढी त्या छावणीची व्याप्ती होती... २-३ मैल त्याचा परीघ होता. 

बादशहाच्या चाकरीतील मराठा सैन्याची आतबाहेर येण्या जाण्या साठीची खुण देखील संताजीने आपल्या गुप्तहेरां तर्फे मिळवून ठेवली होती...

मोघली सैन्याला खुण पटली...व त्यांनी हे सैन्य आपल्याच बादशहाच्या चाकरीतले.. मराठा सरदारांचे सैन्य समजून वाट मोकळी करून दिली....छावणीची सुरवात झाली...मध्यरात्रीची वेळ असल्याने.. पहारा देणारे पथके सोडून बहुतांशी सैन्य झोपी गेले होते...वेळेचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशहाच्या डेऱ्या कडे कूच केले...

बादशहाचा तो भव्य दिव्या डेरा समोर आला...त्या भोवताली.. सैन्याचे सुरक्षा कडे होते...

संताजींनी सैन्यास गटा गटा मध्ये विभागले.. व एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू केला.. बादशहाच्या छावणीवर हल्ला सुरु झाला... साखर झोपेत असलेले बादशहाचे सैनिकांना काही कळायलाच मार्ग न्हवता कि नेमका काय प्रकार चालू आहे..

बादशहाच्या मुख्य डेऱ्यावरही आक्रमण केले...खुद्द संताजी त्यास मार्गदर्शन करत होते...मिळाला तर बादशहालाच आडवा पाडू असाच काही निर्धार होता...पण बादशाहाला बादशाही सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवले...संताजी आणि सैन्याने.. औरंगजेबाच्या डेऱ्याचे तनावे तोडले.. डेरा कोसळला...डेरा जमीनदोस्त केला.. डेऱ्याचा कळस सोन्याचा होता.. तो विजयाची निशाणी म्हणून कापला..मिळेल त्या मोघली सैन्याला कापायचे चालू होते... जेवढी शक्य होईल तेवढ्या गोष्टींचे नुकसान करणे चालू होते. ..ह्या पराक्रमाची तोडच नाही..एवढ्या मोठ्या सैन्याच्या छावणीत अगदी तुरळक सैन्य घेऊन जाणे आणि औरंगजेबाला अस्मान दाखवून येणे.. म्हणजे खरंच पराकोटीचे शौर्य आहे. नागोजीच्या पत्नीमुळे आणि बादशहाच्या इतराजीसाठी नागोजीने संताजीस निशस्ञ अंघोळीस असताना ठार केले . संताजीच्या मृत्यू ने खरेतर मराठी दौलतीस मोठे नूकसान झाले होते .अशा या पराक्रमी सेनापतीचा  १८ जुन १६९७ रोजी मुत्यु झाला. 

संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी - म्हाळोजीराव घोरपडे यांनी- कुरुंदवाड येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणार्‍या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर एक सुब्रह्मणेश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. कुरुंदवाड संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे.

======================================

Senapati Santaji Ghorpade



Facebook link http://bit.ly/3gLaTDa

Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav and Sakal Maharashtra were wasting everything. Aurangzeb did not want to be allowed to go through Maharashtra alive. Under the leadership, all Marathas and Maharashtra fought together and finally Aurangzeb, who left Delhi and marched on Maharashtra, reached the soil of Maharashtra.

(Photo: Kurundwad Ghat Samadhi)

While Chhatrapati Rajaram Maharaj was on the fort of Jinji, the fort was besieged by the tyrant Zulfiqar Khan. So Maharaj was stuck on the fort. At that time, the responsibility of freeing the Maharajah was accepted by the Maratha Sardar Santaji Ghorpade. At that time, Santaji and Dhanaji were showing such feats that even Aurangzeb had defeated them. The Mughal army used to see wood and stone chiefs at Tarjali. It is said that if the horse did not drink the water, he would have killed both of them. After realizing that Santaji was going to Jinji, Aurangzeb sent the insidious Qasim Khan with a large army. Qasim had come with demonic ambition. He had an army of 60,000. But Santaji's guerrilla poetry let him go. Rajaram Maharaj escaped safely from Jinji. The fort of Jinji was then conquered by Zulfiqar Khan. But Chhatrapati did not get caught in his clutches. The great crisis that befell the Maratha Empire was averted.

Aurangzeb's original camp was spread from Tulapur to Wadu Koregaon ... Aurangzeb's army had lakhs of Dimti .. Many Marathi chiefs were also involved in it ...

Santaji had also got the mark of the Maratha army coming and going in the service of the emperor through his spies ...

The Mughal army was marked ... and they left this army in the service of their own emperor .. understanding the army of the Maratha chiefs .... Taking advantage of the time, Santaji marched straight to the emperor's camp ...

He came in front of the magnificent lamp camp of the emperor ... around it .. the security of the army was ...

Santaji divided the army into groups .. and at the same time started a riot in many places .. the attack on the emperor's camp started ... the emperor's soldiers who were sleeping in sugar had no way of knowing what was going on ..

The main camp of the emperor was also attacked ... Santaji himself was guiding it ... If found, there was a decision to stop the emperor ... But the emperor was safely escaped by the royal security guards ... Santaji and the army .. broke the tension of Aurangzeb's camp .. The Dera collapsed ... the Dera was demolished .. the summit of the Dera was made of gold .. it was cut off as a sign of victory .. the Moghul army was being cut down as much as it could be found ... ..There is no end to this feat..to carry such a sparse army in the camp of such a large army and to show Aurangzeb the sky..that is the ultimate bravery. Because of Nagoji's wife and the emperor's objection, Nagoji killed Santaji while he was taking a bath. The death of Santaji had in fact caused great loss to the Marathi wealth. Such a mighty general died on 18th June 1697.

Santaji Ghorpade's father - Mhalojirao Ghorpade - has built a temple of Subrahmaneshwar Mahadev at the confluence of Panchganga and Krishna rivers known as Prayagatirtha at Kurundwad. Samadhi of Santaji Ghorpade is in front of the temple. Shrimant Raghunath Dadasaheb Patwardhan, the head of Kurundwad Sansthan, built a ghat on the river near the temple in 1795.



शुक्रवार, एप्रिल ०९, २०२१

चांदबिबीचा महाल▪️

चांदबिबीचा महाल▪️

▪️ चांदबिबीचा महाल▪️
______________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
______________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3s1WK8p
अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश, लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे. अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्याला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर शाह डोंगरावर चांदबिबीचा महाल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. तो चांदबिबीचा म्हणून ओळखला जात असला, तरी तो मूळचा सलाबतखानाचा महाल आहे.


सलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले. सलाबतखानाची आराम फर्मावण्याची हि जागा होती. दौलताबाद हा सलाबतखानाचा आवडता किल्ला. त्याचे सतत दर्शन व्हावे या हेतूने या महालाची उंची वाढविण्याचा त्याचा इरादा होता. पण तत्पूर्वीच त्याचे तळेगाव-दाभाडे येथे निधन झाले. मोगल परंपरेनुसार या महालात, तळघरामध्ये सलाबतखानाने आपल्या कबरीची व्यवस्था आधीच केली होती. त्याप्रमाणे तेथे तो व त्याची पत्नी चीरनिद्रा घेत आहेत. त्या दोघांच्या कबरी तेथे आहेत. शिवाय तळघरातच, जरा बाहेरच्या बाजूला त्याची दुसरी पत्नी, मुलगा आणि एका कुत्र्याची कबर आहे.
वास्तविक चांदबिबी आणि या महालाचा काहीही संबंध नाही. ही निजामशहाची मुलगी. सलाबतखान आणि तिच्या भेटीचे पुरावे नाहीत. तिच्या कर्तृत्त्वाचा काळ १५८५ नंतरचा मानला जातो. या महालाचे बांधकाम या काळात पूर्ण झाले होते. इतिहास असा असला, तरी आजही सलाबतखानाचे हे स्मारक चांदबिबीच्या नावानेच ओळखले जात आहे.

शनिवार, सप्टेंबर ०५, २०२०

माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही कि दिव्याचा मिणमिणता उजेड नाही... मित्रानो हे कोणते ठिकाण आहे माहित आहे का...?

माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही कि दिव्याचा मिणमिणता उजेड नाही... मित्रानो हे कोणते ठिकाण आहे माहित आहे का...?



माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही कि दिव्याचा मिणमिणता उजेड नाही... मित्रानो हे कोणते ठिकाण आहे माहित आहे का...?

फेसबुक लिंकhttps://bit.ly/333qwis
______________________________

हे आहे छत्रपती शिवरायांच्या बरोबरीने रयतेसाठी हयातभर खस्ता खात रयतेच्या स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या आई जिजाऊच्या लाडक्या स्नुषा, छत्रपती शिवरायांची प्रिय अर्धांगिनी, छत्रपती संभाजीराजे यांच्या वंदनीय मातोश्री व स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाईसाहेब महाराज यांची किल्ले राजगडाच्या पायथ्याला अत्यंत दुर्गम स्थळी असलेली व गुंजवणी नदीच्या किनारी वसलेले समाधी स्थळ..

आज ज्या राज्यात न पावणाऱ्या देवाला सोन्याचे सिंहासन मिळते..हाती तलवार हि न धरलेल्या शेंबड्या वीरांची महाकाय स्मारके उभारली जातात..कुडमुड्या लेखक व कवींची स्मृतिस्थळे जोपासली जातात..भ्रष्टाचारने बरबटलेल्या नेत्यांच्या महाकाय समाध्या उभ्या केल्या जातात..औरंजेबाच्या व आफ्झुल्याच्या समाधीला पंचतारांकित सुविधा मिळतात..त्याच राज्यात आज छत्रपती शिवरायांना कायम स्फुर्तीस्थानी असलेल्या व छत्रपती संभाजी महाराज नावाच्या तुफानाला जन्म देणाऱ्या ह्या स्वराज्याचा आध्य महाराणींच्या समाधीला मात्र वनवासच लाभत आहे हे पाहून कुठल्याही मराठी माणसाच्या काळजाला भोके पडली पाहिजेत दुर्दैवाने पण तसे होताना मात्र दिसत नाही..ज्यांची पाऊले आपण वंदन केली पाहिजेत त्याच सईबाईसाहेबाची हि अवहेलना होत आहे ह्याहून आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते..?

आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी अखंड लक्ष्मी अलंकृत सखल सौभाग्यामंडीत महाराणीसरकार सईबाईसाहेब यांची ३५४ वी पुण्यतिथी त्यानिमित्त आपल्या मराठी माणसांना त्यांची एक आठवण...

माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही तिथे लख्ख दिवे अन गरज तिथे काजवे. सरकार आपले खिसे भरण्यात मग्न आहे.

माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही
सोबत फोटो

शुक्रवार, जुलै ०३, २०२०

रणझुंजार पिलाजीराव जाधव

रणझुंजार पिलाजीराव जाधव

रणझुंजार पिलाजीराव जाधवराव वाघोली. 
________________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 
________________________________

             सिंदखेड येथील राजे लखुजीराव जाधवराव यांचा इतिहास सांगणारे व धनाजीराव जाधवराव  यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची परंपरा कायम राखणारे रणझुंजार पिलाजीराव जाधवराव यांचा लष्करातील पहिल्या दर्जाचे  बिनीचे योद्धे म्हणून ऊल्लेख केला जात.पिलाजीराजे जाधवरावांचा 3 जुलै 1751 हा स्मृतिदिन.
            पिलाजीराव जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजीराव तर आईंचे नाव हंसाई होते.चांगोजीराव जाधवराव यांच्या कडे वाघोली जि.पुणे येथील  पाटीलकीचे वतन चालत आले होते.श्रीमंत सुभेदार पिलाजीराव बिन चांगोजीराव जाधवराव हे एक अष्टपैलू आणि कर्तबगार व्यक्तिमत्व असणारे रणझुंजार सरदार होते.पिलाजीराव जाधवराव हे बाजीराव पेशवे  व चिमाजी आप्पा यांचे युध्द शास्रातील गुरू होते.
          छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते .तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलुक आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजीराव जाधवराव हे या हालचाली मधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे .छत्रपती शााहूराजांना व येसूबाई राणीसाहेब यांना मोगलांच्या कैदेतून सोडवून आणण्यात पिलाजीराव जाधवराव यांचा मोठा सहभाग होता.     
                  जंजिरा, सिद्धी ,बाणकोट ,गोवळकोंडा ,या मोहिमेवर पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते 
           सन.1730 मध्ये वसईची मोहीम झाली, त्या मोहिमेत पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते .या मोहिमेचे नेतृत्व पिलाजीराव जाधवराव यांनी केले होते .या मोहिमेत वसईवर विजय मिळवूनच पिलाजीराव  जाधवराव मागे फिरले .माळवा ,बुंदेलखंड ,उत्तर हिंदुस्थान, सुरत ,भेलसा, प्रयाग ,बंगाल ,नेवासे इथपर्यंत त्यांनी मजल मारून.स. 1742 मध्ये बंगाल प्रांताची चौथाई छत्रपती शाहू महाराजांना मिळवून दिली. 
          औरंगजेबाच्या कैदेतून सुटून छत्रपती शाहूमहाराज महाराष्ट्रात आले, तेव्हा पिलाजीराव जाधवरावांनी त्यांना अत्यंत सहाय्य केले .त्यामुळे छत्रपती शाहूमहाराज व पेशवे या दोघांचाही पिलाजीराव जाधवराव यांच्यावर अत्यंत लोभ जडला. दक्षिणेतील विस्कळीत झालेल्या मराठा साम्राज्याची घडी बसवण्यात पिलाजीराव जाधवराव यांचा मोठा वाटा होता. स.1711 मध्ये सेनापती चंद्रसेन जाधव यांच्या कडून बाळाजी विश्वनाथ पराभूत झाले असता पांडवगडाच्या लढाईत पिलाजीराव जाधवराव यांनी बाळाजी व त्यांच्या कुटुंबास सोडवले .याप्रसंगी पहिले बाजीराव पेशवे अवघे बारा वर्षाचे होते. पिलाजीराव जाधवराव यांचा हा पराक्रम बाजीरावांनी जवळून पाहिल्यामुळे बाजीरावांचे त्यांच्यावरील प्रेम शेवटपर्यंत टिकून राहिले. पुढे पेशवे व निजाम यांचे बिनसले असता औरंगाबाद प्रांत कब्जात आणण्याचा खुद्द बाजीराव पेशव्यांनी खूप प्रयत्न केला ,परंतु त्यांना यश आले नाही .शेवटी ही जोखीम पिलाजीराव जाधवराव यांनी स्वतःहून अंगावर घेतली व घोड्याला उलटी नाल मारून दोन महिने घोड्याची खोगीर न उतरता पिलाजीराव जाधवराव यांनी औरंगाबादवर वसुल बसवला .याबद्दल सुमारे दीड लक्ष रुपयांचा मुलुख बाजीराव यांनी पिलाजी जाधवरावांना छत्रपती शाहूमहाराजांकडून घेऊन दिला
             स.1717 मधे हिंगण गावच्या दमाजी थोरात यांचे बंड मोडून काढून दमाजींना कैद करून छत्रपती शाहूमहाराजांसमोर आणून उभे केले .या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती शाहूमहाराजांनी पिलाजीराव जाधवरावांना पुणे प्रांतातील मौजे दिवे ,मौजे नांदेड ही गावे इनाम दिली .पिलाजीराव जाधवराव यांनी औरंगाबाद प्रांतावर जरब बसवून वसुलीची कायमची व्यवस्था लावून दिली.मोगला विरुद्ध निजाम आणि मराठे यांनी संयुक्तपणे केलेल्या युद्धामध्ये व दाखवलेल्या पराक्रमामुळे पिलाजीराव जाधवराव यांना जलादत्त इन्कलाब म्हणजे रणशूर किंवा शौर्य क्रमाचे मर्मज्ञ अशा उपाधीने गौरवले. 
               स.1729 मध्ये बाजीराव पेशवे छत्रसालाच्या मदतीला गेले त्यावेळी पिलाजीराव जाधवराव त्यांच्याबरोबर होते .या युद्धात त्यांनी शत्रूचा पराभव केला.या युद्धातील पराक्रमामुळे छत्रसाल राजाने पिलाजीराव जाधवरावांना सागर प्रांतातील मोठी जहागिरी दिली. स.1737 मध्ये चिमाजी आप्पाने पोर्तुगीजां विरुद्ध काढलेल्या यशस्वी मोहिमेचे पिलाजीराव जाधवराव नेतृत्व करत होते.शाहूछत्रपती व पेशव्यांच्या तीन पिढ्यांच्या कारकिर्दीत पिलाजीराव जाधवराव यांनी सतत पन्नास वर्ष उत्तर व मध्य हिंदुस्थान ,बंगाल ,कोकण ,कर्नाटक, आणि फिरंगण्यातील अनेक युद्ध मोहिमेत मराठ्यांचे नेतृत्व केले.युद्धप्रसंगी शाहूमहाराज नेहमीच पिलाजीराव  जाधवरावांच्या बरोबर सल्लामसलत करत असत. मध्य हिंदुस्थानात अनेक जहागिऱ्या मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून हुजारातीच्या सैन्याचे शेवटपर्यंत नेतृत्व केले.प्रखर राज्यनिष्ठा ,स्वराज्यप्रेम, असामान्य शौर्य, अध्यात्मवृत्ती ,मुत्सद्देगिरी हे गुण पिलाजीराव यांच्यामध्ये पुरेपूर भरले होते .
 चाकण परगण्यातील गोलेगाव व मरगळ ही दोन गावे इनाम छत्रपती शाहूंमहाराजांनी जाधवरावांना इनाम म्हणून दिली .पेशवे जरी शुरपणे नेतृत्व करत होते तरी ,ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणणारा सूत्रधार म्हणजेच पिलाजीराव जाधवराव हेच होत.छत्रपती शाहूमहाराज यांच्या काळात मराठी राज्याचा जो विस्तार झाला त्या यशाचे फार मोठे वाटेकरी म्हणून पिलाजीराव जाधवरावांचे नाव घ्यावे लागेल .पिलाजीराव जाधवराव यांची कामगिरी मागे टाकून मराठे शाहीच्या इतिहासाची पाने ऊलटू शकणार नाहीत .तीन जुलै स.1751 मध्ये पिलाजीराव जाधवराव काळाच्या पडद्याआड गेले.त्यांची समाधी पुणे जिल्ह्यात वाघोली येथे आहे 
 "अशा या महान पराक्रमी वीराला स्मृतीदिनानिमित्त  आमचा मानाचा मुजरा "
________________________________
रणझुंजार पिलाजीराव जाधव