चंद्रपूर जिल्ह्याने मे महिना लागताच उष्णतेच्या उच्चांक गाठला असून गेल्या वर्षी मी महिन्याच्या तुलनेत यंदातापमानात वृद्धी झाली गेल्यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यात 47.2 डिग्री सेल्सिअस सर्वाधिक तापमान होते .मात्र यावर्षी 11 मे रोजी 47.3 डिग्री सेल्सियस तापमान शहराने अनुभवले . नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट राहणार असून या काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने अनेक ठिकाणी सार्वजनिक पाणपोई सुरु केली आहे .नागरिकांनी उन्हाळ्यात दुपारच्या उन्हामध्ये बाहेरच पडू नये अशा पद्धतीचे आवाहन करण्यात आले आहे .कामानिमित्त बाहेर पडायचे झाल्यास डोक्याला पांढरा दुपट्टा .सोबत पाण्याची बाटली ठेवण्याचे सांगितले आहे . भरपूर पाणी दिवसभर पिणे याशिवाय उन्हापासून बचाव करण्यासाठी सायंकाळी थंड पाण्याने अंघोळ करण्याची सुद्धा सांगितले आहे .जिल्हा प्रशासनाने सुद्धा यासंदर्भात उपाययोजना केल्या असून सर्व संबंधित यंत्रणेला उष्णतेच्या लाटे बद्दलची माहिती दिली आहे . महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे . उन्ह लागल्याचे लक्षण दिसताच मनपा शहर प्राथमिक आरोग्य केंद्रात औशोधोपचार करवून घ्यावे ,असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे .सामान्य रुग्णालयामध्ये ऊन लागलेल्या लोकांसाठी एक विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे . उन्ह लागल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन केले आहे .
कळविणे आवश्यक असल्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).