विकासाला बगल देत राजकारण
चंद्रपूर(ललित लांजेवार)सोमवारी जटपुरा गेट येथे शिवसेनेने केलेल आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी आहे असा अनाघाती आरोप आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजपच्या महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी केला आहे, चंद्रपूर शहराला ५०० वर्षांचा इतिहास आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभलेले असल्याची नोंद आहे. येथील परकोट,किल्ले,मंदिर, समाधी स्थळे, हे गुंड राज्याचे वैभव दर्शविणारे केंद्र आहे. त्यांच्या सौंदर्यात लाइटिंगमुळे भर पडणार आहे. वाहतुकीची कोंडी आणि लाइटिंग हा सबंध सामान्यांच्या बुद्धीला न पटणारा आहे.त्यामुळे जोरगेवार हे राजकीय हेतूने पूर्वजांनी 500 वर्षांपासून जतन केलेल्या पुरातत्त्व संपत्तीला संपवण्याचा डाव खेळात आहेत असा आरोप भाजपच्या महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी शिवसेनेवर केला आहे. या जटपुरा गेटला धक्का जरी लागला तर आम्ही आदिवासी समाज रस्त्यावर उतरू असा ईशारा यावेळी नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी दिला आहे,
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज 500 वर्षांपासून गोंड राजांनी उभारलेल्या वैभवाचे जतन करत आलेला आहे. या संपत्तीला अधिक वैभव लाभण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने लावण्यासाठी भरीव निधी देऊन मदत केली आहे. इतिहासाला आपण जपायला हवे परंतु विकासापोटी असंतुष्ट प्रवृत्तीचे लोकी ऐतिहासिक वारसा जतन न करता तो नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे हे आम्ही आदिवासी समाज कदापी खपवून घेणार नाही,
५०० वर्षांचा पुरातत्त्व गोंड राजाचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकाद्वारे पुढच्या पिढीला न सांगता तो प्रत्यक्षात जतन करून ठेवू, या सौंदर्यीकरण आला कुठलाही विरोध केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करू असे देखील म्हणाले.
पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न
अशा प्रकारचे पुरातन वस्तू यांचे जतन करण्यासाठी दिल्ली,औरंगाबाद येथे अशा प्रकारची लाइटिंग लावण्यात आलेली आहे. याच प्रकारची लाइटिंग चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवात वाढ करण्याकरिता लावण्यात येणार आहे यामुळे चंद्रपूर आकर्षणाचे केंद्र बनेल व गोंड राज्याच्या ऐतिहासिक पुढची पिढी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेन. की आमच्या आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे विकासाला साथ देत विकासासोबत राहायला हवे असा सल्ला देखील यववेली देण्यात आला