वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर एसीबी च्या जाळ्यात,, तीन हजार रुपयांची लाच घेतांना अटक,
कारंजा( घा)--- येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांना आज दि,12 बुधवार ला तीन हजार रुपयांची लाच घेतांना त्यांच्या स्थानिक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार तालुक्यातील रानवाडी येथील एक शेतकऱ्याने आक्टोंबर 2022 मध्ये स्वतःच्या जेसिबी ने दुसऱ्या एका शेतकऱ्याला वाहिवाटिकरिता जमिनीचे सपाटीकरण करून दिले होते, त्यामुळे याबाबत त्याच्यावर वनगुन्हा नोंद करण्यात आला होता व त्याचा जेसिबी वनविभागाने जप्त केला होता, याबाबत हा तक्रारदार आरएफओ, गायनेर यांच्या संपर्कात होता, तेव्हा गायनेर यांनी त्या तक्रारदाराला सदर प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर या तक्रारदाराने याबाबत दि,10 एप्रिल रोजी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात स्वतः येऊन आरोपी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर याच्या विरोधात तक्रार दिली होती, यावरून त्या कार्यालयाने लाच मागणी पडताळणी केली असता चालान दंड म्हणून 2 हजार रुपये व स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता एक हजार रुपये लाच मागितली, यावरून आज सकाळी साडेदहा च्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांना तक्रारदारकडून तीन हजार रुपये स्वीकारताना त्यांच्या कार्यालयात सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले, व ती रक्कम जप्त करण्यात आली, ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डी, सी, खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप थडवे , सहाय्यक फौजदार रवींद्र बावणेर, पोलीस हवालदार संतोष बावनकुळे, पोलीस शिपाई कैलास वालदे, प्रीतम इंगळे,प्रशांत मानमोडे यांनी सापळा रचून ही कार्यवाही केली
Wardha breaking: Forest range officer arrested while accepting bribe of Rs.3000