Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०७, २०२३

twitter ट्विटरवर Whatsapp प्रमाणं Chat चॅट करता येणार

twitter ट्विटरवर Whatsapp प्रमाणं Chat चॅट करता येणार 


twitter ट्विटरवर Whatsapp प्रमाणं Chat चॅट करता येणार


ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी कंपनी डायरेक्ट मॅसेज रिस्पॉन्डिंग फीचर (Direct Message Responding Feature सुरु करण्याची घोषणा केली आहे. काही नवे फिचर्स ही या मार्चअखेरपर्यंत उपलब्ध करुन देणार आहेत. Aiming to roll out ability to reply to individual DMs, use any reaction emoji & encryption later this month असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

You can chat on Twitter like Whatsapp


ट्विटमध्ये मस्क यांनी असे म्हटले की,  (Twitter New Feature) वैयक्तिक डायरेक्ट मेसेज मध्ये रिप्लाय करण्यासह रिऍक्शन, इमोजी आणि एनक्रिप्शन सारखे फिचर्स युजर्सला लवकरत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. म्हणजेच व्हाॅट्सॲप प्रमाणे चॅट करता येणार आहे. 


यापूर्वी ही मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सला काही सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. या व्यतिरिक्त ट्विटरचे नवे व्यू काउंट्स फिचर युट्यूब आणि इंस्टाग्राम फिचर प्रमाणे काम करणार आहे. येथे युजर्सला आपली पोस्ट किती लोकांनी पाहिली ते कळणार आहे. म्हणजेच आता ट्विटवर लाइक, कमेंट्स आणि रिट्विट असणाऱ्या स्टेटस बारमध्ये आणखी एक ऑप्शन व्यूजचा सुद्धा दिला जाणार आहे. या सेक्शन मध्ये आपल्या आणि अन्य युजर्सच्या पोस्ट किती लोकांनी पाहिली हे कळणार आहे. या फिचरला आयओएस आणि अँड्रॉइड या दोघांसाठी रोलआउट करण्यात आले आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.