सावनकुमार टाक यांच्या निधनाने बहुमुखी प्रतिभेचा कलावंत हरपला : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*
हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात निर्माता , दिग्दर्शक आणि संगीतकार सावनकुमार टाक यांच्या निधनाने बहुमुखी प्रतिभेचा कलावंत हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
सावन कुमार टाक हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार होते. साजन बिना सुहागन, सौतेन, सौतेन की बेटी, सनम बेवफा, आणि बेवफा से वफा यांसारख्या यशस्वी चित्रपटांसह त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. संजीव कुमार आणि मेहमूद ज्युनियर सारख्या अभिनेत्यांना ब्रेक देण्याचे श्रेय त्याला जाते
सावनकुमार यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट सिनेप्रेक्षकांना दिले. मनोरंजक चित्रपट देताना त्यातून सामाजिक संदेश देखील त्यांनी दिला आहे. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी संधी दिली व कालांतराने ते कलावंत सिनेक्षेत्रात रसिकप्रिय ठरले. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो व त्यांच्या पावन आत्म्यास शांती प्रदान करो असेही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.