Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २६, २०२२

आमदार किशोर जोरगेवार यांच्या बालाजी वॉर्ड येथील कार्यालयाला चंद्रपूर पोलिसांची अतिरिक्त सुरक्षा |

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ह्यांना साथ देणारे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या बालाजी वॉर्ड येथील कार्यालयाला चंद्रपूर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरविली आहे.



मागील अडीच वर्षांपासून ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे  किशोर जोरगेवार ह्यांनी अचानक एकनाथ शिंदे गटाला समर्थन जाहीर करून थेट गुवाहाटी गाठले. त्यानंतर समाजमाध्यमांवर आ. किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात अनेक संदेश फिरत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी देखील आ. किशोर जोरगेवार ह्यांना लक्ष करत मागील अडीच वर्षांचा हिशेब मागितला असुन, महविकस आघाडीशी काडीमोड घेतल्याप्रकरणी टीकेची झोड उठवली आहे.


किशोर जोरगेवार हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते होते. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यालयाला धोका असुन शिवसैनिक कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करू शकतात, ह्या भीतीने पोलिसांनी आमदार कार्यालयास अतिरिक्त सुरक्षा पुरविली आहे.

#eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb

Aurangabad - metropolis in Maharashtra

Kirit Somaiya - Former Member of Parliament Lok Sabha
Maharashtra Legislative Council - State Legislature

Bharti Praveen Pawar - Union Minister of State for Health and Family Welfare
breakout


Anand Dighe - Leader








SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.