जुन्नर /आनंद कांबळे
केवाडी(ता.जुन्नर) येथील प्रदीप लांडे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अंतर्गत सहाय्यक अभियंता (जलसंपदा विभाग, राजपत्रित) पदावर अनुसूचित जमाती मधून निवड झाली आहे. या परीक्षेत त्याने ४५० पैकी २०४ गुण मिळवले आहेत. वयाच्या २७ व्या वर्षी त्याने यश मिळवले आहे.
प्रदीपचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगिरी व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल निमगिरी येथे झाले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालया (JSPM) मधुन अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. २०१९ मध्ये झालेल्या MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेतून त्याची निवड झाली आहे. मुलाखत डिसेंबर २०२१ मध्ये झाली होती.
या आधी त्याची सरळसेवा भरती २०१८ मध्ये दुय्यम अभियंता पदी निवड झाली असून मुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंता पदावर कार्यरत आहे. काम आणि अभ्यासाची जोड बसवून हे घवघवित यश त्याने पहिल्याच प्रयत्नात सलग दुसर्यांदा मिळवले आहे.
त्याचे वडील साळु सिताराम लांडे हे एक शेतकरी असून अशिक्षित आहेत. तो कुटुंबातील पहिलाच अधिकारी असून त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याने त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. त्याचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Junnar's Pradip Lande selected as Assistant Engineer!