Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २१, २०२१

"या मेसेजची प्रतीक्षा करत आहे. याला थोडा वेळ लागू शकतो" "



एखाद्या संपर्काने तुम्हाला मेसेज पाठवला असेल, तर त्या मेसेजच्या जागी तुम्हाला कधीकधी "या मेसेजची प्रतीक्षा करत आहे. याला थोडा वेळ लागू शकतो"  "Waiting for this message. This may take a while."  मेसेज दिसू शकतो.

 असे का होत असेल. तर जाणून घेऊया 

 एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमुळे तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा फोन ऑनलाइन असण्याची आणि तुम्हाला पाठवलेला मेसेज नीट एन्क्रिप्ट होण्याची गरज असते. त्यामुळे, Waiting for this message. This may take a while. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा मेसेज मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीशी चॅट करत आहात त्या व्यक्तीने नुकतेच WhatsApp पुन्हा इंस्टॉल केले असल्यास असे होऊ शकते.

ही प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज करत आहात त्या व्यक्तीला त्यांच्या फोनवर WhatsApp उघडून सुरू ठेवण्यास सांगू शकता.


एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन विषयी माहिती

गोपनीयता आणि सुरक्षा आमच्या रक्तात भिनलेली आहे आणि त्यासाठीच आम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ करतो. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा लाभलेले मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेजेस, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स आणि कॉल्स चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.

वैयक्तिक मेसेजिंग

तुम्ही WhatsApp Messenger वापरून दुसऱ्या व्यक्तीशी चॅट करता तेव्हा तुमच्या संभाषणांना सुरक्षित करण्यासाठी WhatsApp चे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन वापरले जाते. तुम्ही ज्या व्यक्तीशी संभाषण करत आहात ती व्यक्ती आणि खुद्द तुम्ही, हेच फक्त ते संभाषण वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही - अशी ग्वाही WhatsApp चे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन देते. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये तुमच्या मेसेजेसला एका कुलुपाने सुरक्षित केले जाते आणि हे मेसेजेस उघडून वाचण्यासाठी लागणारी कुलुपाची चावी फक्त तुमच्याकडे आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेजेस पाठवले आहेत त्या व्यक्तीकडे असते. हे सर्व आपोआप होते. तुमचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही खास सेटिंग सुरू करावे लागत नाही.

बिझनेस मेसेजिंग

प्रत्येक WhatsApp मेसेजला तुमच्या डिव्हाइसमधून निघण्याआधी सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉलने सुरक्षित केले जाते. तुम्ही एखाद्या WhatsApp Business खात्यास मेसेज करता तेव्हा तुमचा मेसेज त्या बिझनेसने निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवला जातो.

WhatsApp यासाठी WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या किंवा मेसेजेस व्यवस्थापित करण्यासाठी व स्टोअर करण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची मदत घेणाऱ्या बिझनेससोबतची चॅट्स विचारात घेते. बिझनेसला मेसेज मिळाल्यावर त्या मेसेजला त्या बिझनेसची स्वतःची गोपनीयता धोरणे लागू होतात. तो बिझनेस या मेसेजेसवर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना किंवा व्हेंडर्सना नियुक्त करू शकतो.

काही बिझनेस1 ग्राहकांचे मेसेजेस स्टोअर करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी WhatsApp ची पालक कंपनी असलेल्या Facebook ची निवड करू शकतात. तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात हे ठरवण्यासाठी Facebook तुमचे मेसेजेस ऑटोमॅटिकली वापरणार नाही, मात्र बिझनेसला त्यांना प्राप्त झालेले मेसेजेस/चॅट्स त्यांच्या मार्केटिंग व जाहिरातीसाठी वापरता येतील व त्यामध्ये Facebook वरील जाहिरातीचाही समावेश असू शकतो. एखाद्या बिझनेसची गोपनीयता धोरणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसशी संपर्क साधू शकता.

टीप: एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केलेल्या एखाद्या चॅटचे एन्क्रिप्शन स्टेटस वापरकर्त्याला कळवल्याशिवाय बदलता येत नाही. कोणती चॅट्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केली जातात याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचा व्हाइट पेपर पहा.

पेमेंट्स

WhatsApp वरील 'पेमेंट्स' हे फीचर काही निवडक देशांमध्येच उपलब्ध आहे आणि ते एका बॅंक खात्यामधून दुसऱ्या बॅंक खात्यात WhatsApp ने पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. कार्डचा नंबर आणि बॅंकेशी संबंधित नंबर्स हे एन्क्रिप्ट केलेल्या आणि उच्च सुरक्षा लाभलेल्या नेटवर्कवर स्टोअर केलेले असतात. मात्र, बॅंकांना पेमेंट्सशी संबंधित व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी पेमेंट्सशी संबंधित माहिती लागते. त्यामुळे, ही पेमेंट्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेली नसतात.

संपर्क माहिती स्क्रीनवरील "सुरक्षा कोड सत्यापन" हे काय आहे?

तुम्ही एखाद्या चॅटला पाठवत असलेले मेसेजेस आणि कॉल्स हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत का हे पडताळून पाहण्यासाठी तुमच्या प्रत्येक चॅटला एक स्वतंत्र सुरक्षा कोड असतो.

टीप: एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेल्या चॅट्ससाठी पडताळणी प्रक्रिया पर्यायी आहे. ही प्रक्रिया फक्त तुम्ही पाठवलेले मेसेजेस आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत का हे तपासण्यासाठी वापरली जाते.

हा कोड तुम्हाला संपर्क माहिती स्क्रीनमध्ये क्यु आर कोड आणि ६०-अंकी कोड अशा दोन्ही स्वरूपात मिळू शकतो. प्रत्येक चॅटसाठी एक युनिक कोड असतो. तुम्ही ज्यांना मेसेजेस पाठवत आहात त्या व्यक्तीसोबत त्या कोडची तुलना करून तुम्ही पाठवलेले मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत का याची पडताळणी करता येते. सुरक्षा कोड म्हणजे तुमच्याशी शेअर केलेल्या स्पेशल किल्लीचे दर्शनीय स्वरूप असते. काळजी करू नका, ही खरी किल्ली नसते, खरी किल्ली नेहमीच गुप्त ठेवली जाते.

तुमचे चॅट एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहे का हे पडताळून पाहण्यासाठी:

  1. चॅट उघडा.
  2. संपर्क माहिती स्क्रीन उघडण्यासाठी संपर्काच्या नावावर टॅप करा.
  3. क्यु आर कोड आणि ६० अंकी कोड पाहण्यासाठी एन्क्रिप्शन वर टॅप करा.
    • टीप: हे फीचर तुमच्यासोबत एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेले चॅट करणाऱ्या संपर्कासाठीच उपलब्ध आहे.

तुम्ही आणि तुमचा एखादा संपर्क एकमेकांच्या बाजूला असाल तर, तुम्ही एकमेकांचे क्यु आर कोड स्कॅन करून शकता किंवा ६० अंकी कोड प्रत्यक्ष पडताळून पाहू शकता. तुम्ही क्यु आर कोड स्कॅन केला आणि कोड सारखाच असेल तर, हिरवी बरोबरची खूण दिसेल. ते सारखे असल्याने त्या व्यक्तीखेरीज दुसरे कोणीही तुमचे मेसेजेस किंवा कॉल्स हस्तक्षेप करून वाचू किंवा ऐकू शकत नाही याची खात्री पटते आणि याप्रकारे तुम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिशनची पडताळणी करू शकता.

कोड सारखे नसतील तर, तुम्ही दुसऱ्याच एखाद्या संपर्काचा किंवा फोन नंबरचा कोड स्कॅन करत आहात असे असू शकते. तुमच्या संपर्काने अलीकडेच WhatsApp परत इंस्टॉल केले असेल किंवा फोन बदलला असेल तर, तुम्ही त्यांना नवीन मेसेज पाठवून आणि नंतर कोड स्कॅन करून कोड रिफ्रेश करावा असे आम्ही सुचवतो. सुरक्षा कोड बदलाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.

तुम्ही आणि तुमचा एखादा संपर्क एकमेकांच्या बाजूला नसाल तर, तुम्ही त्यांना ६० अंकी कोड पाठवू शकता. कोड पाठवल्यानंतर संपर्कास तसे कळवा. संपर्कास तो कोड मिळाला की त्यांनी तो लिहून घेणे आणि तो व 'एन्क्रिप्शन' च्या खाली दिसणारा ६० अंकी कोड सारखाच आहे याची खात्री करून घेणे आवश्यक असते. तुमच्याकडे Android फोन किंवा iPhone असल्यास तुम्ही 'सुरक्षा कोड सत्यापन' मधील शेअर करा बटण वापरून एसएमएस, ईमेल इत्यादी माध्यमांद्वारे ६० अंकी कोड पाठवू शकता.

WhatsApp एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन का ऑफर करते आणि 'WhatsApp लोकांना सुरक्षित ठेवते' याचा नक्की अर्थ काय होतो?

सुरक्षितता हा WhatsApp च्या सेवेचा गाभा आहे. हॅकर्सनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांची खाजगी माहिती मिळवली आणि त्या चोरलेल्या माहितीचा वापर करून लोकांना फसवले, अशी कितीतरी उदाहरणे आम्ही पाहिलेली आहेत. २०१६ मध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची अंमलबजावणी पूर्ण झाल्यापासून डिजिटल सुरक्षेला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे.

WhatsApp तुमच्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेल्या मेसेजमधील मजकूर बघू शकत नाही किंवा तुमचे कॉल्स ऐकू शकत नाही. कारण, WhatsApp वरून पाठवलेल्या आणि आलेल्या मेसेजेसचे एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर होते. एखादा मेसेज डिव्हाइसमधून बाहेर पडण्याआगोदर एका क्रिप्टोग्राफिक कुलुपाने सुरक्षित केला जातो आणि त्याची किल्ली फक्त प्राप्तकर्त्याकडे असते. शिवाय, ही किल्ली प्रत्येक मेसेजसाठी वेगळी असते. हे सर्व जरी पार्श्वभूमीमध्ये होत असले तरी, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील सुरक्षा कोड तपासून तुमची संभाषणे सुरक्षित आहेत का याची खात्री करू शकता. हे कसे काम करते ते जाणून घेण्यासाठी कृपया आमचा व्हाइट पेपर पहा.

साहजिकच आहे की, कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचा वापर कसा होतो अशी विचारणा लोकांनी आमच्याकडे केली. जगभरात लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कायदा व्यवस्था ज्याप्रकारचे काम करते त्याचा WhatsApp ला आदरच वाटतो. कायदा अंमलबजावणी संस्थांतर्फे येणाऱ्या विनंत्यांचे लागू असलेले कायदे आणि धोरणांनुसार पुनरावलोकन केले जाते आणि त्यांची शहानिशा करून मग त्यांना उत्तर दिले जाते. उत्तर देताना आम्ही आणीबाणी स्वरूपाच्या विनंत्यांना प्रथम प्राधान्य देतो. सामाजिक शिक्षणाचा एक भाग म्हणून आम्ही मर्यादित स्वरूपावर गोळा करतो ती माहिती आणि या संस्थांना WhatsApp ची मदत हवी असल्यास काय करावे याबद्दलची माहिती कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी प्रकाशित केली आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे वाचा.

Waiting for this message. This may take a while.

At times, you might see the above message in place of what you were sent from a contact. Due to end-to-end encryption, you might need to wait for someone's message to arrive because their phone needs to come online and properly encrypt the message for you. This can typically occur if you or the person you're chatting with recently reinstalled WhatsApp.

To speed up this process, you can try asking the person you're messaging to open WhatsApp on their phone.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.