Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०१, २०२१

लडाखमध्ये पायाभूत सुधारणांमुळे वाढली पर्यटकांची संख्या |

चीनला पायाभूत सुविधांमधील वाढीमुळे भारताकडून मिळाला शह

लेफ्टनंट जनरल संजय कुळकर्णी यांचे मत



मुंबई : लडाख  Leh, Ladakh stateमध्ये यावेळी मी जितके पर्यटक पाहिले तितके पर्यटक यापूर्वी पाहिले नव्हते. विशेष करून देशी आणि विदेशी पर्यटकांमध्ये देशी पर्यटकांची संख्या अधिक होती. लेह, लडाख, कारगील या भागातील पायाभूत सुविधा सुधारली असल्याचेच हे द्योतक आहे, असे सांगत चीनच्या सीमावर्ती भागातील भारताच्या हद्दीत होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची स्थिती लक्षणीय आणि प्रशंसनीय आहे, असे मत लेफ्टनंट जनरल संजय कुळकर्णी (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या ऑनलाईन मुलाखातीत ते बोलत होते. स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी रविवारी दि. १ ऑगस्ट २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या या मुलाखतवजा संवादात कुळकर्णी यांनी बॉर्डर रोड ऑग्रनायझेशनच्या या क्षेत्रातील कामाबाबत प्रशंसा केली. ‘लडाखमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून भारताने चीनला दिलेले प्रत्युत्तर’ या संबंधात हा संवाद साधला गेला होता.

लेह, लडाख, कारगील येथे लोक येत आहेत. मुळात ज्या भागातील रस्ते पूर्वी ६-७ महिने बंद असत, बर्फामुळे वाहने अडकून पडत, वाहतूक ठप्प होत असे तेथे आता पायाभूत सुविधांमध्ये झालेली प्रगती लक्षणीय आहे. बारा महिने चोवीस तास तेथे जाता येते इतकेच नव्हेत तर ज्या भागात प्रवासाला ३-४ तास लागत तो प्रवास आता १५ मिनिटांमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले.

लेह, लडाख, कारगील या आत्यंतिक खडतर आणि नैसर्गिकदृष्टीनेही अति कडाक्याची थंडी असलेल्या भागांमध्ये काम करणेही सोपे नाही. असे असताना काासाठी मिळणाऱ्या ६ महिन्यांच्या कालावधीत रस्ते आणि पायाभूत सुविधांचा जोर लावला गेला आहे आणि रस्ते बांधणी हे तसे सोपे काम नाही, ते ही करून मुळात त्यापेक्षाही कठीण असलेले देखभालीचे काम यशस्वीपणे केले गेले आहे, असे संजय कुळकर्णी यांनी सांगितले.  अति कडाक्याची थंडी शून्याखाली अनेक अंश असणारे तापमान आणि सुमारे १५-२० फूट इतक्या जाडीचा बर्फ ज्या पर्वतांवर साचतो अशा भौगोलिकदृष्टीने कठीण असलेल्या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने मोठे काम साध्य केले आहे. विमानतळही होत आहेत. चीनच्या आणि भारताच्या या सीमावर्ती भागात भारतीय बाजूला असलेली भौगोलिक रचना ही डोंगराळ आहे तर चीनच्या भागात पठारी आहे. हे पाहाता त्यामुळे चीनमध्ये रस्ते बांधणी आणि अन्य कामांसाठी सुलभता आहे, असे सांगत अशा स्थितीतही आता मोठी वर्दळ भारताच्या बाजूला होऊ लागली आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, असे ते म्हणाले.

लेहला जाण्यासाठी पूर्वी जम्मू- उधमपूर - श्रीनगर - द्रास - कारगील आणि नंतर लेह असा प्रवास करीत सात ते आठ दिवसांचा वेळ द्यावा लागत होता, आता दोन दिवसात हा प्रवास करता येतो. तसेच हिमाचल प्रदेशातून मनाली - लेह मार्गाचाही वापर करता येतो, असे यावेळी महाजन यांनी सांगितले.

रस्त्यांवर हिमस्खलन, दरडी कोसळणे, बर्फ वितळणे यामुळे मोठे आघात होत  असतात. तेथे लोक, जवान ज्या प्रकारे राहातात, ते सोपे नाही, अशात भारतीय हवाईदलाने केलेली कामगिरीही महत्वाची आहे. भारतीय सैनिक त्या वातावरणात ज्या प्रकारे राहातो ते पाहून चीनला नेहमीच या भारतीय सैनिकांची भीती वाटते. कारण आधुनिक सुविधा असतानाही, चीनचे सैनिक तसे या भागात राहू शकत नाहीत. भारतीय सैनिक सुमारे दीड वर्षे तैनात असतो तर चीनच्या सैनिकाची फार कमी काळात तेथून बदली केला जाते, अशी माहितीही कुळकर्णी यांनी दिली.

अलीकडेच चीनचे पंतप्रधान शि जिन पिंग यांनी तिबेटमध्ये रेल्वेने येऊन परत रेल्वेने जाऊन तिबेटमधील चिनी भागातील तिबेटी लोकानीचीन सरकारला मदत करावी, यासाठी आमिषे दाखवली गेली. कारण त्या भागात चीनमधील तिबेटी ज्या पद्धतीत राहात आहेत, ते पाहाता त्यांची मदत चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला हवी आहे. त्यासाठी तिबेटीना मदतीचा हात पुढे करून दाखवीत भारतावर दबाव टाकण्याचा हेतू यामागे आहे, यामुळेच या तिबेटमध्ये तब्बल तीस वर्षांनी चीनचा पंतप्रधान भेट देण्यासाठी आला होता, असेही कुळकर्णी यांनी सांगितले.


पेज नेव्हिगेशन



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.