Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ३१, २०२१

केवळ आकसापोटी आणि बदनामी करण्यासाठी पोलिसात तक्रार

गटनेते पप्पू देशमुख यांना प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रश्नच येत नाही


भ्रष्टाचारच घडला नाही तर पुरावे कुठले देणार : महापौर 

चंद्रपूर : आज दिनांक 31.8.2021 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहामध्ये मासिक सर्वसाधारण आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना आपत्तीमुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना या आमसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा आहे. अशाप्रकारची मुभा देणारे लेखी पत्र आमसभेच्या अजेंडा सोबत सर्व पदाधिकारी व गट नेत्यांना देण्यात आले. त्यानुसार सर्व निमंत्रित आमसभेत उपस्थित राहिले. त्यामुळे एकट्या गटनेते पप्पू देशमुख (Pappu Deshamkh) यांना प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रश्नच येत नाही.  

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी निमंत्रित सदस्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखले नाही. गटनेते पप्पू देशमुख यांनी जमाव केल्याने सुरक्षा रक्षकानी थांबविले. केवळ त्यांना एकट्याला जाता येईल, असे सांगितले. मात्र, देशमुख आणि इतर आभासी निमंत्रित सदस्य आत येण्यास अडून राहिल्याने सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार उघडले नाही. तरीही केवळ आकसापोटी आणि बदनामी करण्यासाठी Pappu Deshamkh यांनी महापौर राखी कंचर्लावार तसेच आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. आजच्या आमसभेत करोडो रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो, असे प्रसिद्धीमाध्यमाना सांगून निरर्थक आरोप देशमुख करीत आहेत. भ्रष्टाचारच घडला नाही तर पुरावे कुठले देणार, असे प्रतिउत्तर महापौर राखी संजय कंचर्लावार  CMC Chandrapur Mayor Rakhi Kancharlawar यांनी दिले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.