Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०९, २०२१

ओबीसींच्या सहभागाशिवाय आंबेडकरी आंदोलनाला पुर्णत्व नाही! बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने |

BSP PResident Sandip Tajane



बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचे प्रतिपादन



मुंबई,९ ऑगस्ट-  इतर मागासवर्गीय समाजाला एकत्रित करून त्यांच्या सहभागाशिवाय आंबेडकरी आंदोलनाला पुर्णत्व नाही, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी आज, सोमवारी चंद्रपुर मध्ये 'संवाद यात्रे'दरम्यान बसपा कार्यकर्ते, पदाधिकार्यांना संबोधित करतांना केले. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठीच संविधानात कलम ३४० ची तरतूद केली आहे.


 पंरतु,आजपर्यंत कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात ओबीसींना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. ओबीसींना त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढायची असेल, तर बहुजन समाज पार्टीशिवाय दुसरा कुठला पर्याय नसल्याचे अँड.ताजने म्हणाले.

डॉ.आंबेडकरांनी चंद्रपुरकरांवर नागपूर प्रमाणेच प्रेम केले. याच प्रेमापोटी १५ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांच्या चरणस्पर्शाने चंद्रपूर नगरी पावन झाली. अशात बाबासाहेबांचे आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी चंद्रपुरकरांची आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सुश्री बहन मायावती जी आणि निळ्या झेंड्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले. मा.कांशीराम साहेबांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी चंद्रपुरच्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. याच मेहनतीच्या जोरावर चंद्रपुर महानगर पालिकेत बसपाचे ९ नगरसेवक निवडूण आले. आता बसपाचा महापौर बनावा, यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकार्यांनी प्रयत्न करीत आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन अँड.ताजने यांनी केले.

बैठकीत जिल्ह्यातील ६ ही मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदार संघानिहाय 'कॅडर कॅम्प' आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा पदाधिकार्यांना देण्यात आल्याचे, अँड.ताजने म्हणाले. बैठकीत प्रदेश महासचिव अँड.सुनिल डोंगरे, जिल्हाध्यक्ष मुक्कदर मेश्राम, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा ताई नेताम तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




ओबीसींचा स्वाभिमान,सन्मान केवळ बसपात-मा.प्रमोद रैना


ओबीसी समाजाचा सन्मान केवळ बसपाच वाढवू शकते. इतर मागासवर्गीयांना मानसन्मानाने स्वाभिमान वाढवण्याचे काम केवळ सुश्री.बहन मायावती जीच करू शकतात. मायावती जी यांनी त्यांच्या शासनकाळात याप्रमाणे जातीगत लोकसंख्येच्या आधारे सर्वांना सर्वसमावेशक भागीदारी देण्याचे काम केले, त्याचप्रमाणे राज्यातदेखील ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येनूसार राजकीय भागीदारी देण्यासाठी बसपा कटिबद्ध आहे. ओबीसींनी त्यामुळे निळ्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवाहन बसपा राज्य प्रभारी प्रमोद रैना यांनी यावेळी केले.

BSP PResident Sandip Tajane



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.