कंत्राटीपद्धतीने सुरु होणार पे-पार्किंग
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव
चंद्रपूर शहर महानगरपालिका मालकीच्या मनपा गांधी चौक पटांगण, सात मजली इमारतीच्या दक्षिण व पश्चिम भागाकडील पार्किंगची जागा, महात्मा गांधी भवन मागील जुनी महात्मा गांधी शाळा येथे असलेल्या खुल्या जागेवर सध्यास्थितीत मनपाच्या कर्मचाऱ्याकडून दोन चाकी वाहनाकडून १० / रूपये व चार चाकी वाहनाकडून २० / - रूपये प्रती वाहनाचा शुल्क आकारणी केली जात आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २४३ अ ( २ ) अन्वये आयुक्त यांना, महानगरपालिकेच्या संमतीने योग्य वाटतील अशा अटी व शर्ती यांच्या आधीन राहून कोणत्याही व्यक्तीकडून वाहन उभी करून ठेवण्यासाठी किवा थांबवण्यासाठी अशा जागेच्या किंवा ठिकाणाच्या केलेल्या वापराकरीता प्रत्येक दिवसासाठी किवा त्यांच्या भागासाठी त्याला योग्य वाटेल अशी फी, किंवा शुल्क आकारता येईल ” असे नमूद आहे. सद्यास्थितीमध्ये गांधी चौक, येथे मनपा कर्मचाऱ्याकडून पार्किंगची देखदेख व वसुली करण्यात येत आहे.
मनपा आस्थापनेवरील अपुरे मनुष्यबळ बघता सदर काम त्रयस्थ संस्थेला दिल्यास त्यातून उत्पन्न तसेच कर्मचाऱ्यांची बचत होवू शकेल. त्यामुळे मनपा पार्कींगमध्ये कार्यक्रम असलेला दिवस वगळता इतर दिवसामध्ये पे पार्कीग करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ग्रेनगंज मार्केटमधील जागा पे पार्किंगसाठी देण्याचा ठराव आमसभेत घेण्यात आला.
Chandrapur CMC Pay Parking