जुन्नर /आनंद कांबळे
स्व. रामचंद्जी बाबेल, ट्रस्ट, धोलवड ( पुणे )यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या तसेच दुर्गसंवर्धन कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना दुर्ग प्रेरणा, समाज प्रेरणा, ज्ञान प्रेरणा ,विज्ञान प्रेरणा आणि विविध शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे संस्थेचे सचिव रतिलाल बाबेल यांनी सांगितले .
पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून शैक्षणिक वर्ष 2019-20 चे पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम घेऊन वितरित करता येत नसल्यामुळे, सदर पुरस्कार प्रत्येक मान्यवरांना ,त्यांची वेळ घेवून लवकरच समक्ष भेट देऊन वितरित केले जाणार आहेत.
##समाज #प्रेरणा #पुरस्कार 2019-20
१) श्री. नेवकर सदाशिव सिताराम., नारायणगाव.
जुन्या पिढीतील वनस्पती अभ्यासक
२) श्री. दुगड ऊल्हास पोपट., राष्ट्रीय खेळाडू व प्राचार्य ,भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल ,अहमदनगर.
३) प्रा.डॉ. पुरुषोत्तम दत्तात्रय काळे., लेखक, कवी ,वक्ता व संपादक, महाराष्ट्र साहित्य पत्रिका., घोडेगाव ,तालुका. आंबेगाव, जिल्हा- पुणे.
४) श्री संतोष हरिश्चंद्र सहाणे., प्रमुख मार्गदर्शक व सेंद्रिय शेती सल्लागार, जुन्नर.
५) कै. सौ. आशा नितिन डावखरे., आदर्श शिक्षिका लेखिका, नारायणगाव.
६) वोपा, vowels of the people association, पुणे.
शाळा व शिक्षण संस्था उत्कृष्ट होण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था.
##दुर्ग प्रेरणा पुरस्कार 2019-20###
श्री. गौरव शामकांत शेवाळे.,
सह्याद्री दुर्ग सेवक, चिंचवड.
###उपक्रमशील शाळा पुरस्कार 2019-20###.
१)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगवे ,तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे.
२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद; तालुका- जुन्नर, जिल्हा- पुणे.
३) न्यू इंग्लिश स्कूल ,आंबोली; तालुका- जुन्नर, जिल्हा -पुणे.
##ज्ञान प्रेरणा पुरस्कार 2019 -20###
१) श्री. किन्हाळे मोहन निवृत्ती.
मुख्याध्यापक, तोरणा सागर माध्यमिक विद्यालय ,निवि ,तालुका - वेल्हे,जिल्हा -.पुणे.
२) श्री. महेश श्रीपत पोखरकर.
प्राध्यापक, समर्थ पॉलिटेक्निक आणि समर्थ इंजिनिअरिंग कॉलेज,बेल्हे.
३) श्री. नंदाराम रोहिदास टेकावडे.
उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखर शाळा (निवृत्ती नगर).
४) श्रीमती मृणाल नंदकिशोर गांजाळे.
उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,पिंपळगाव तर्फे महाळुंगे ;तालुका -आंबेगाव ,जिल्हा- पुणे.
# विज्ञान प्रेरणा पुरस्कार.
श्री.निलेश ज्ञानेश्वर पोखरकर.
(विज्ञान सहाय्यक, आयुका वेधशाळा,गिरवली.ता.आंबेगाव. जि. पुणे.)