Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०४, २०२१

५ जून रोजी येथे होईल लसीकरण



चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या आरोग्य विभागच्या वतीने ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. शनिवार, दि. ५ जून २०२१ रोजी सुरू असलेली लसीकरण केंद्र सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत राहतील. 
पहिला आणि दुसरा डोस* (कोविशिल्ड) साठी १. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड, २. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वॉर्ड ३. सावित्रीबाई फुले शाळा, नेताजी चौक, ४. मातोश्री शाळा, तुकुम

केवळ दुसरा डोस* (कोव्हॅक्सीन) १. एरिया हॉस्पिटल, लालपेठ २. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका, नागपूर रोड ३. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यथे राहणार आहे. 

- संपूर्ण लसीकरण ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.  कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा. दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील. विनाकारण गर्दी करू नये. 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.