Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २०, २०२१

भाजपाचे राज्यात नव्या जोमाने व्यापक सेवाकार्य


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार

भाजपाचे राज्यात नव्या जोमाने व्यापक सेवाकार्य

प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना कोरोनाच्या संकटात देशवासियांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन गरजूंना मदत करावी, असे आवाहन केले असून त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे राज्यातील कार्यकर्ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या जोमाने अधिक व्यापक सेवाकार्य करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी मोठे सेवाकार्य केले होते. शहरी आणि ग्रामीण भागात सर्वत्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला थेट मदत केली होती. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सेवाकार्याची योजना पक्षाच्या पदाधिकारी – लोकप्रतिनिधींच्या ऑनलाईन बैठकीत नुकतीच निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मा. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आता हे सेवाकार्य अधिक जोमाने आणि व्यापक करण्यात येईल.

त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य निर्बंध पाळले जावेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध सोसायट्या - गल्ल्यांमध्ये युवकांनी ‘कोविड अनुशासन कमिट्या’ बनवाव्यात अशी महत्त्वाची सूचना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या स्थानिक समित्या बनवून लोकांना मदत करण्यासाठी पक्षाचा युवा मोर्चा पुढाकार घेईल व अत्यंत प्रभावी कार्य करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या संकटावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो याचा नेमका उपाय सांगितला आणि जनतेला धीर दिला. आर्थिक चक्र चालू ठेऊन लोकांची रोजीरोटी वाचवायची आणि त्याचवेळी कोरोनावर मात करायची याचा मार्ग त्यांनी दाखविला. त्या मार्गाने देश यशस्वी होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी सामना केला. त्याच पद्धतीने दुसऱ्या लाटेचाही सामना करू, असा विश्वास मा. प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.