Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २६, २०२१

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम : जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन



 

नागपूर दि. 26 : राज्यशासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत उत्कृष्ट वार्तांकन व लेख लिहिणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्कार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील  पुरस्कारांसाठी  तात्काळ प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यातआले आहे. या पुरस्कारासाठी  2 मे 2020 ते 1 मे 2021 या कालावधीत प्रसिध्द झालेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरिता मूल्यमापनार्थ ग्राह्य धरण्यात येईल.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम प्रभावी व यशस्वीरित्या राबविण्यामध्ये  प्रसार माध्यमांचा मोठा वाटा आहे. यासाठी पूरक  व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावरील  पुरस्कार दिले जातात.  

जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार, व्दीतीय पुरस्कार 15 हजार तर तृतीय पुरस्कार 10 हजार रूपयांची पुरस्कार राशी असुन विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार 1 लक्ष रूपये तर व्दितीय पुरस्कार 75 हजार तर तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार 2 लक्ष 50 हजार व्दितीय पुरस्कार एक लक्ष 50 हजार तर तृतीय पुरस्कार 1 लक्ष रूपये आहे.

जिल्हा स्तरावरील पुरस्कारासाठी या संबंधीचे  निकष  पूर्ण  करणाऱ्या  पात्र  पत्रकारांनी  विहित  नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत सर्व कागदपत्रे  व कात्रणांसह 15 जूनपर्यत पाठवावेत असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर यांनी केले आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.