Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०३, २०२१

मी घोडा खरेदी करून घोड्यावरून जिल्हाधिकारी ऑफिसला येणार आहे कारण...अधिकाऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

🔹 मी घोडा खरेदी करून घोड्यावरून जिल्हाधिकारी ऑफिसला येणार आहे कारण...अधिकाऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 🔹

________________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________________
नांदेड: जिल्हाधिकारी कार्यालयातील एका आधिकारी पाठीच्या कणादुखीने त्रस्त आहे,कार्यालयात जाण्यायेण्यासाठी  एक जालीम  उपाय शोधला आहे. त्यांनी ऑफिसला येण्यासाठी घोड्याची योजना आखली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मला पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने टू व्हिलरवरू येताना त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे खरेदी ठरवले आहे. त्यामुळे मला  वेळेत घोड्यावर येणं शक्य होईल. त्यामुळे घोडा बांधण्याची मला परवानगी मिळावी. देशमुख यांनी पाठवलेल्या पत्राला पोहोच देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हाच तो अर्ज👇


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.