दं वाशिंगटन पोस्टच्या वृत्त स्फोटाने
भीमा कोरेगाव कटावर शिक्कामोर्तब..
दं वॉशिंगटन पोस्ट हे अमेरिकन वृत्तपत्र. शोधपत्रकारितेचा जनक. जगातील अनेक प्रकरण चव्हाट्यावर आणली. त्या वृतपत्राचे भीमा कोरेगावच्या कटात डोकावणे. ही जागतिक घटना. भीमा कोरेगाव स्वाभिमानाची चळवळ. आंबेडरकरवाद्यांची प्रेरणा. तिला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अर्बन नक्षलचा ठपका ठेवला. निमित्त ठरली एल्गार परिषद. मात्र त्यामागे होता कुटील डाव. बरं झालं. दं वाशिंगटन पोष्टने स्फोट केला. त्यातून एल्गार मागचा कट उलगडला. शोध पत्रकारितेने आरसा दाखविला. त्याचा कोणी कितीही इंकार करो. विश्वास तर करावा लागेल. अमेरिकन पत्रकार एकाद्या प्रकरणात लक्ष घालतात. ते तडीस नेईपर्यंत स्वस्त बसत नाहीत. निकाल लागेपर्यंत थांबत नाही. दोन-तीन वर्ष पाठपुरावा केल्याचा इतिहास आहे. या धुर्त मनुवादी कटाच्या विरोधात या वृत्तपत्राचे उतरणे. मानवीहक्काच्या जागतिक पायमल्ली विरोधात आवाज उचलणे होय. हे वृत्तपत्र ना विकावू. ना दबावू. पत्रकार एक,एक कडी जोडत जातील. सत्य बाहेर काढतील. या प्रकरणात वाशिंग्टन पोस्टने उडी घेतली. बरं झालं. या निमित्त जागतिक पत्रकारितेचे तेज दिसेल. वॉटरगेट कांड जगभर गाजले. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते प्रकरण वॉशिंगटन पोस्टच्या दोन पत्रकारांनी उघडकीस आणले होते. शोधपत्रकारितेचा उदय ते कांड समजले जाते. त्या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी भीमा कोरेगाव प्रकणावर प्रकाश टाकला. 20 जणांच्या अटकेला कटाचा भाग ठरविला. जगातील अशाप्रकारचा पहिला कट संबोधने. यात सर्व काही आले. एकप्रकारे कट झाला. यावर हे शिक्कामोर्तब आहे. यात राजकारणी, तपास यंत्रणा सारख्याच दोषी . आणखी कोणत्या यंत्रणा दोषी आहेत. ते सर्व उघडकीस येईल. हा कट झाला. तेव्हा केंद्रात मोदी अन् महाराष्ट्रात फडणवीस सरकार होती. कटात कोण सहभागी होते. हे वॉशिंगटन पोस्टचे पत्रकार शोधून काढतील. अहवालाचा भाग दोन हा त्यावर प्रकाश टाकणारा असेल.
कटाचे असे आहेत धागे...
एल्गार परिषद पुण्यात होते. रात्री 10 वाजेपर्यंत चालते. तिकडे वढू बूद्रूकला दिवस उजाडते. तोच हल्ले सुरु होतात. एकतर्फी हल्ले. हे कळते. तेव्हा प्रतिकार होतो. सरकार तिला दंगल म्हणते. केंद्रीय तपास यंत्रणा येते. ते सांगते. हे देशद्रोही कारस्थान. कारस्थानाचे आरोपी हल्लेखोर नाहीत. ज्यांच्यावर हल्ले होतात ते. त्यांचे समर्थक किंवा त्यांच्या विचाराचे. त्यांना आरोपी केले जाते. 1 जानेवारी-2018 ची घटना. हजारोंनी बघितली. त्यांचा एनआयएच्या शोधावर विश्वास नाही. मात्र सत्तेपढे शहाणपण चालत नाही. त्यांची प्रचिती येत होती. त्याला छेद दिला वाशिग्टंन पोस्टने. त्याने अनेकाची किरकिरी झाली. उरलीसुरली लक्तरे आणखी बाहेर येतील.कटाचे भागीदार उघडे पडतील. यात मानवीहक्काचे सर्रास उल्लंघन आहे. जागतिक मानवीहक्क आयोग यात लक्ष घालील.मस्तवाल यंत्रणांना वेसन घालण्याची ही वेळ. देर है, किंतु अंधेर नाही. म्हणतात ते असेच असते.
तपास संस्थांच सूत्रधार...
केंद्रीय तपास यंत्रणा आणि तत्कालिन राज्य सरकार कटाची सूत्रधार. एका दगडात अनेक चळवळी संपविण्याचा डाव. जनाधार असलेल्या चळवळी टॉरगेट केल्या. एक कटाचा धागा रोवला. त्या धाग्यात अनेकांना गुंडाळले . त्यांचा परस्पर कधी संबंध आला नाही. असेही धागे जोडले. त्यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही. अनेकांनी भीमा कोरेगाव कधी बघितलं नाही. तर तिथे जाण्याचा प्रश्नच नाही. दिल्ली, कलकत्ता, बंगलोर, चेनैईत बसून दंगल घडविली. ती सुध्दा पुण्यापासून दूर 50 किलोमीटर अंतरावर . हा तर्क मुर्खपणाचा होय. तपास यंत्रणेने अकलेचे तारे तोंडले. दिले ठोकून या दंगलीमागे अर्बन नक्षली आहेत. दंगली घडविणाऱ्यांचाही. त्यावर विश्वास बसणार नाही. तरी कट रचला. त्या कटात अनेक चळवळी संपविण्याचा डाव रचला. त्यांची स्क्रिप्ट कुठल्या केंद्रात लिहिली गेली. हा प्रश्न होता . ते केंद्र व त्यातील माणसंही उजेडात येतील. पुरावे केवळ लॅपटॉपमध्ये मिळाले. मोबाईल किंवा कागदपत्रात नाही.
आर्सेनलचा अहवाल..
केद्रीय तपास यंत्रणेने जेएनयूचे संशोधक रोना विल्सन यांना खलनायक ठरविले . या दंगलीचा मास्टर माईंड ठरविले. ती स्क्रिप्ट तयार केली एका केंद्रात. त्या केंद्राचा तपास यंत्रणांवर प्रभाव. हे कारस्थान आहे. जगातील असे हे एकमेव प्रकरण .हा गौप्यस्फोट अमेरिकेतील लोकप्रिय दैनिक दं वाशिंगटन पोस्टने केला. त्यासाठी आर्सेनल कंन्सल्टिंग कंपनीच्या अहवालाचा संदर्भ दिला. ती अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक कंपनी .तिचे जगात नाव . या कंपनीने अहवालचा एक भाग उघड केला. अहवालाचा दुसरा भाग बाकी आहे. या अर्धा भागाने खळबळ उडाली. या अहवालात दिलेला घटनाक्रम म्हणजे कटाचा एक एक धागा. हॅकर्सने विल्सनच्या लॅपटॉपचा ताबा घेतला. त्यानंतर त्यात कटाचा मजकूर प्लांट केला. त्यात स्फोटक पत्रं टाकली. त्यांच्या हिडन फाईल्स बनविल्या. ती पत्रं सेव्ह केली. या फाईल्स विल्सन यांनी एकदाही उघडल्या नाहीत. सुमारे 22 महिने हा प्रकार सुरु होता. विल्सनचे वकील सुदीप पासबोला यांनी लॅपटॉपची इलेक्ट्रानिक कॉपी या कंपनीला पाठविली होती. कंपनीने तिचा शास्त्रसुध्द अभ्यास केला. फॉरेन्सिक अंकेक्षण अहवाल तयार केला. त्या फॉरेन्सिक अहवालाने कटाचे धागे उघड केले. खोट्या गुन्हात कसे गोवण्यात आले. त्याचा हा शास्त्रशुध्द पुरावा होय. त्याला खोटा ठरविण्याचा प्रयत्न अंगलट येईल. भारतात न्याय मिळेल. न्याय मिळाला नाहीतर जागतिक न्यायालयात जाईल. अनेक जणांना तपासाविणा अटक केली.ठोस आरोपपत्र नाही. तरी तीन वर्षापासून कारागृहात डांबले. ही मनुवादी आणीबाणी. त्यांचाही जीव आहे. त्यांनाही बायका-लेकर आहेत. निष्ठूरतेचा हा कळस आहे. यासाठी माफी नाही. अनेकदा वाटतं . माणसं ,यंत्रणा इतक्या निर्दयी कशा असू शकतात. मनूवादात त्याची बीजं आढळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची होळी केली. ती काहींच्या मनात दडून आहे. त्यांची मनशुध्दी हवी आहे. मन की बातच्या आड दडलेली आहे.आता वाशिंगटन पोस्टकडे लक्ष लागलेले आहे.
शिक्रापूर ठाण्यात गुन्हा
भीमा कोरेगाव हल्ले. यात दोन जण ठार झाले. त्यापैकी एक जण तणसवाडीत १ जानेवारीच्या हल्यात त्याचे पडसाद उमटल्यानंतर मराठवाड्यात एकाचा मृत्यू झाला. जाळपोळ, दगडफेकीच्या महाराष्ट्रभर शेकडो घटना घडल्या. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी सर्वप्रथम शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे व अन्यच्या विरोधात आहेत. पोलिसांनी प्रामाणिकपणे गुन्हे दाखल केले. या घटना होत्या. ग्रामीण पोलिस अधिक्षक, पुणे. यांच्या हद्दीत . तब्बल सात दिवसांनी पुणे पोलिस आयुक्ततालयाच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात एक तक्रार येते. त्यामध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिंतावणीखोर भाषणं झाली. या परिषदेत नक्षली सहभाग होता. त्यांच्यामुळे दंगल घडली. यामुळे आ.जिग्नेश मेवानी, अमर खालिद, सुधीर ढवळे आदिंच्या विरोधात विश्राम बाग ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. आठवड्याभरानंतर तक्रार येते. पोलिस शिक्रापूरप्रमाणे स्वत:हून गुन्हे दाखल करीत नाहीत. तिथून होते कटाची सुरुवात. खरे तर या परिषदेत संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली होती. ही शपथ घेणाऱ्यांचे कंनेक्शन सीपीआय(माओवादी) या प्रतिबंधित संघटनेशी जोडण्यात आले. या परिषदेच्या आयोजकांमध्ये माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत, माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसेपाटील यांचा समावेश होता. त्यांच्या विरूध्द गुन्हे नाहीत. मात्र या परिषदेत सहभागी न झालेल्यांना आरोपी करण्यात आले. अटक करण्यात आली. आनंद तेलतुंबडे, वरवरा राव, व्हनरेन गोन्सालाविस,अस्ता परेरा, सुधा भारद्वाज, गौत्तम नवलाखा, फादर स्टेन आदींचा समावेश आहे. यांच्या स्वत:च्या चळवळी आहेत. कोणाची विद्यार्थी चळवळ. कोणी आदिवासीसाठी लढतो. कोणी मानवी हक्कासाठी. तर कोणी कामगारांसाठी. ऐषाआराम सोडून लोकांमध्ये राहतात. त्याच्यात मिसळतात. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, झोपडपट्टीत राहणाऱ्याचा. जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा आवाज बुलंद करतात. त्यांना देशद्रोही,अर्बन नक्षली ठरविणे. हा कटाचा भाग. याने मानवीहक्काच्या चळवळी संपतील. हा गैरसमज. चळवळींना वारसदार असतात. एक गेला. तर दुसरा उभा होतो. नव्या तेजाने. नव्या शक्तीने. लोककल्याणात झटणाऱ्यासाठी हजारों मदतीचे हात असतात. त्यापैकी एक हात वॉशिंगटन पोस्ट . भीमा कोरेगाव कांडाचा तपास धिम्या गतीने सुरु आहे. सोबत अटक सत्रही सुरु आहे. ओढून ताणून संबंध जोडला जात आहे. न्यायालयात ते टिकणार नाही. हे तपास यंत्रणेला माहित होते. तरी तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला. लोक चळवळी जोर धरत आहेत. त्या संपविण्याचा हा धूर्त डाव आहे. या प्रकरणाचा तपास करावयाचा असेल तर १ डिसेंबर- २०१७ रोजी पिंपरी चिंचवडमध्ये बैठक झाली. इथंपासून तपास करावा लागेल. तेव्हा दंगलीस खरे कारणीभूत कोण याचा उलगडा होईल. त्यावर पडदा टाकून नक्षली सहभागाचा ढोल वाजविणे. हा कारस्थानाचा भाग होय. हा मनुवाद्यांचा कट. त्याचा उलगडा होणे काळाची गरज आहे. वॉशिगटन पोस्ट ही त्यांची सुरुवात आहे.
- भूपेंद्र गणवीर
................BG....................