Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१

श्री. विजय सिंघल यांनी महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची स्वीकारली सूत्रे



मुंबई/खबरबात:
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. विजय सिंघल (भाप्रसे) यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री. विजय सिंघल हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व त्याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. 

भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ बॅचचे श्री. विजय सिंघल अधिकारी असून त्यांनी आयआयटी रुरकीमधून स्थापत्य याविषयात अभियांत्रिकी पदवीचे सुवर्णपदक पटकाविले आहे. सोबतच आयआयटी दिल्लीमधून बिल्डींग सायन्स व कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ही एमटेक आणि लंडन येथे पब्लिक सर्विसेस पॉलिसी व मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.

या अगोदर श्री. विजय सिंघल यांनी जिल्हाधिकारी (हिंगोली, जळगाव), मुख्य कार्यकारी अधिकारी, (अहमदनगर, औंरगाबाद) महानगरपालिका आयुक्त (ठाणे, कोल्हापूर), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (मुंबई) तसेच साखर आयुक्त, उद्योग आयुक्त म्हणून महत्वाच्या पदांवर काम केले आहे. 

नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख प्रशासनासाठी आग्रही असलेले श्री. विजय सिंघल यांना जळगाव जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पाच्या कामगिरीसाठी प्राईम मिनिस्टर अवॉर्ड एक्सलेन्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार तत्कालिन मा.पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला आहे. या नदीजोड प्रकल्पातील कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. तसेच विशेष निमंत्रणावरून त्यांनी ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) व न्यूयॉर्क (यूएसए) येथे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नदीजोड प्रकल्पावर व्याख्यान दिले आहे. या प्रकल्पाचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारतातील ‘सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी’ या विभागात मुंबई शहरासाठी त्यांना मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रशासनामध्ये विविध डिजिटल उपक्रम, ऑनलाईन यंत्रणा आदींसाठी श्री. विजय सिंघल यांना महाराष्ट्र शासनाचे सूवर्णपदक, रौप्यपदक तर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.