ओळख कर्तृत्वाची - भाग 8
कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 8 !!
दादासाहेब कन्नमवारांचे वडील सांबशिवपंत यांना नेहमीच वाटायचे की मुलाने नोकरी करावी. स्वातंत्र्याच्या या चळवळीतून अंग काढून घ्यावे, परंतु दादासाहेबांन्ना सुरुवातीपासूनच गुलामगिरीची चीड होती. उपाशी राहावे, देशासाठी मरावे पण ही पारतंत्र्यातील नोकरी करू नये. काहीही करून देशसेवा करावी असा त्यांनी निर्धार केला होता. वडिलांकडून कोणत्याही धंद्याकरीता पैसे मिळण्याची आशा नसल्यामुळे त्यांनी वर्तमानपत्र विकून देशसेवा करावी हा निर्धार केला.ह्याच अवधीत "लोकमान्य दैनिक" खाडिलकराच्या संपादत्वाखाली निघणार म्हणून प्रसिद्ध झाले. दादासाहेबांनी या दैनिकाची एजन्सी घेण्याचे ठरविले. पंचवीस रुपये डेपॉज़िट म्हणून भरल्याशिवाय एजन्सी मिळू शकत नव्हती. परिस्थिती जेमतेम, पैसे आणायचे कुठून हा प्रश्न दादासाहेबांसमोर पडला. त्यांनी मित्रांना मागितले असते तर सहज मिळाले असते. परंतु, ते त्यांना आवडले नाही. त्यांना त्यांच्या सासर कढुन लग्नात देणगीदाखल मिळालेल्या दोन अंगठ्या होत्या त्या गहाण ठेवल्या आणि मिळालेल्या पैशातून पंचवीस रु.पाठवून एजन्सी घेतली.
कन्नमवार साहेब पहिल्यांदा फक्तं लोकमान्य हेच दैनिक विकत असले तरी नंतर स्वराज्य, तिलक, वंदे मातरम, यंग इंडिया, मराठी नवजीवन अशी अनेक पत्रक विकत होते. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते असहकार चळवळीचा प्रचार करीत होते.
1 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी नागपूरवरून नवसंदेश साप्ताहिक सुरू केली. मात्र, नवसंदेशचे संपादक कन्नमवारजी नव्हते. परंतु, या साप्ताहिकातील सर्वच लेख (बातम्यासोडून) कन्नमवारजी स्वतः लिहीत. या साप्ताहिकातील येणारे मथळे किती बोलके, किती समर्पक व किती अर्थवाहक होते हे खाली मथळ्याच्या नमुन्यावरून लक्षात येते.
" गरिबांवर जरा अन्याय होत असेल तर कॉंग्रेस कमिठ्यांची गरज काय ?" (नवसंदेश, 3 डिसेंबर 1948)
"भारत का असली राजा किसान है!" (नवसंदेश,1 एप्रिल 1948)
"कसेल त्याची जमीन, कार्य करेल त्याची कॉंग्रेस"(नवसंदेश,2 जून 1948)
असे कितीतरी उदा.आहे.
दादासाहेब कन्नमवारांनी काही पुस्तकेसुद्दा लिहिली, "गांधी गीतांजली" हे पुस्तक 1940 साली, "भारताचा थोर भिक्षेकरी गांधी" हे पुस्तक 1958 साली आणि "स्वच्छताप्रिय गांधी, काटकसरी गांधी", विनोदप्रिय गांधी. "गांधी अँड चिल्ड्रेन" या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे ते इंग्रजीत आहे.
कन्नमवारजींना इंग्रजी येत नाही असा अपप्रचार त्यांचा विरोधकांनी सतत केला होता. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकाची विचार केला पाहिजे. यातील सोपी भाषा लक्षणीय आहे. "राजमाता जिजाबाई" हे पुस्तक 17 जून 1963 रोजी जिजामाता जन्मस्थान सिंदखेड येथे प्रकाशित करण्यात आले. त्यांचे प्रत्येक पुस्तक फक्त गांधींवर लिहिलेले होते, अपवाद फक्त "राजमाता जिजाबाई" हा पुस्तक होय. मुख्यमंत्री पदावर असताना जिजाऊ चरित्र लिहिणारे एकमेव मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार होय.
दादासाहेबांसोबत ताईसाहेब खंबीरपणे देशसेवेकरीता उभे होते, म्हणून दादासाहेब मुक्तपणे आणि निस्वार्थपणाने देशसेवा केला हाही इतिहास विसरता कामा नये. ताईसाहेबांचा योगदान भरपूर आहे. त्यांचाही इतिहास दडलेल्या अवस्थेत आहे. दादासाहेबांचे जन्मसोहळा आणि पुण्यतिथी सोबत ताईसाहेबांचे सुद्दा जन्मसोहळा आणि पुण्यतिथी भव्य स्वरूपात झाले पाहिजे.
- खिमेश मारोतराव बढिये
प्रचारक (नागपूर)
दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर
8888422662, 9423640394