Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २९, २०२१

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना धमकी देणार्या विरोधात करवाही करा ; भाजयुमो नागपुरची मागणी



अरूण वानकर या नागपुरस्थित एकाइसमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बद्दल जे अपशब्द काढलेले आहेत आणि त्यांना धमकी देण्याचा जो प्रयत्न केला हे अतिशय चुकीचे आहे. समाजामध्ये तेढ व अस्थिरता निर्माण करणारे आहे. अश्या प्रकारचे असंतोशजनक वक्तव्य जर का कोणी केले तर त्यामुळे समाजाची समाजिक स्थिती ढासाळु शकते. या विषयाला घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अरुण वानकर यांच्या विरोधात तक्रार केली आणि सदर इसमावर तत्काळ एफ.आय. आर दाखल करून कडक शिक्षा द्यावी अशी विनंती केली.

हे आंदोलन सचिन करारे व दीपांशु लिंगायत यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मंडळ अध्यक्ष बादल राऊत,मंडळ अध्यक्ष यश सातपुते, मंडळ अध्यक्ष सनी राऊत, आलोक पांडे, रितेश रहाटे, जय साजवाणी, राकेश भोयर, करन यादव, अंकुर थेरे, मनमीत पिल्लारे, अथर्व त्रिवेदी, अक्षय ठवकर, सागर गंधर्व, संकेत कुकडे, पिंट्टु पटेल, प्रभात अवथनकर, हर्षल अपगडे, छोटू मांडले, मोनू माने, पवन खंडेलवाल, प्रभात अंधंकर, रितेश पांडे, रशीद शेख, यश पांडे उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.