चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिकेतर्फे शहरातील रस्ते फोडण्याचा कार्यक्रम सुरु आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरातील नवीन रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. महानगर पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. परंतु भाजप शहर जिल्हाध्यक्षांनी चक्क राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या विरोधात नौटंकी आंदोलन करून शहरातील नागरिकांची दिशाभूल केली, असल्याचा आरोप काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी यांनी केले आहे.
देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहे. जिल्ह्यातील शेतकरी देखील संकटात आहेत. त्यासोबतच हिवाळी अधिवेशन देखील रद्द करण्यात आले आहे. परंतु या गंभीर समस्यांकडे मात्र या भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी पाठ फिरवली आहे. या गंभीर विषयावर ब्र देखील काढत नसून शेतकरी विरोधी भूमिकेला समर्थन दर्शवित असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेत मागील भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला गेला आहे. मागील काही दिवसा आधी कचरा घोटाळा समोर आणला आहे. त्यासोबतच अन्य ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात घोटाळे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत असलेल्यांची केले आहे. विकासाच्या नावावर शहर खड्डेमय केले आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष हे अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणारे व्यक्ती आहेत. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यासोबत त्यांनी चंद्रपूर शहरातील महानगर पालिकेतील भष्ट्राचारावर आवाज उचलून घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे. असा टोला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी मारला.