नागपूरच्या मुलीला फसविणाऱ्या आरोपीस जम्मूतून अटक
नागपूर येथील २४ वर्षाची एक मुलगी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करत होती. तिची एका जम्मू काश्मीर मधील कातरा जिल्ह्यातील एक मुलांबरोबर we chat या अँपवर ओळख झाली. या मुलाने नागपूरच्या मुलीबरोबर मैत्री करून तिला फसवून तिच्यावर २०१७ ते २०२० मध्ये विविध ठिकाणी लैगिंक अत्याचार केले. तिला कातरा येथे बोलवून बलात्कार केला व मारहाण केली.
लैगिंक अत्याचारावेळी त्याने तिला लग्नाचे वचन दिले व तिचे अश्लील फोटो काढून ते फेसबुकवर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी दिली. या बाबत मुलीने पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात fir क्र १३०६/२०२० अन्वये दि ०२ जुलै २०२० रोजी बलात्कार चा गुन्हा नोंद केला. सदर मुलीने आपल्या अत्याचार बाबत व मुलाला अटक करण्याबाबत उपसभापती कार्यालयाला ही कळविले होते. या यानंतर या मुलींवरील झालेला अन्याय गंभीर असलेने त्याबाबत मा श्री अनिल देशमुख गृह मंत्री याना दि १० ऑक्टोबर २०२० रोजी या केसमध्ये लक्ष घालून आरोपीस अटक करण्यासाठी संबंधीत पोलीस निरीक्षक याना सूचना देणेबाबत लेखी पत्र पाठवले. त्याच दिवशी गृहमंत्र्यांना फोन वरून सविस्तर चर्चा केली. कोविड१९ च्या लॉक डाउन च्या कालावधीत सर्व वाहतूक बंद होती. व आरोपी जम्मू मधील कतरा शहरात आपल्या घरी होता. तरीही पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता यांनी सहकार नगर पोलीस स्टेशन च्या अधिकारी यांना सूचना दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी जम्मू येथील कतरा शहरात जाऊन दि०८ नोव्हेंबर २०२० रोजी सदर आरोपीस अटक केली व पुण्यात आणले. सदर आरोपीस दि १४ नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर केले असता त्यास ९ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
या पीडित मुलीला चांगला सरकारी वकील मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असलेबाबत डॉ नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
तसेच याबाबत संबंधीत अत्याचार पीडित मुलीने *मा.ना. श्री उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री, श्री अनिल गृहमंत्री व डॉ नीलम गोऱ्हे ताई उपसभापती विधान परिषद यांचे आभार मानले आहेत.* असेही डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.